मुली नाचवून पैसे कमावतात, गुंड पोसतात, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अनिल परब इरेला पेटले

मुंबई तक

Anil Parab on Yogesh Kadam : मुली नाचवून पैसे कमावतात, गुंड पोसतात, योगेश कदमांची हकालपट्टी केल्या गप्प बसणार नाही, अनिल परबांची टीका

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुली नाचवून पैसे कमावतात, गुंड पोसतात, अनिल परबांची योगेश कदमांवर टीका

point

योगेश कदमांची हकालपट्टी केल्या गप्प बसणार नाही, अनिल परबांचा निर्धार

Anil Parab on Yogesh Kadam , Mumbai :  पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला. मात्र, त्याचा भावाला म्हणजे सचिन घायवळला देण्यात असलेला शस्त्रपरवाना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने परवाना देण्यात आल्याचं समोर आल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी योगेश कदमांची हकालपट्टी केल्या गप्प बसणार नाही, असा निर्धार अनिल परब यांनी केलाय.

'उपमुख्यमंत्री पाठिशी असल्याने गृहराज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात थैमान घातलंय'

अनिल परब म्हणाले, महाराष्ट्राच्या राज्याला कलंकित करणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक कारनामे आत्तापर्यंत मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवले आहेत. पुराव्यांसह सगळी प्रकरणे मी सरकार समोर ठेवली. मुख्यमंत्र्यांची अडचण काय आहे? मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रत्येकवेळी पाठिशी घातलं. मंत्र्यांनी काही केलं तर चालतं, असा संदेश मुख्यमंत्री या माध्यमातून देत आहेत. आमचं त्यांना अभय आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खेडच्या सभेत सांगितलं होतं की, योगेश मी तुझ्या पाठिशी आहे. तुला काही काळजी करण्याच कारण नाही. उपमुख्यमंत्री पाठिशी असल्याने गृहराज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात थैमान घातलंय. त्याचा अजून एक पुरावा महाराष्ट्राच्या समोर आलाय.

हेही वाचा : सचिन घायवळ शस्त्रपरवाना प्रकरण तापलं, मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी; सुषमा अंधारे आक्रमक

"अशा माणसाला गृहराज्यमंत्री शस्त्र परवाना देतात"

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवॉर सुरु आहे. गुंड  निलेश घायवळ देशाबाहेर गेला आहे. याच्या भावाला सचिन घायवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना मंजूर केला आहे. याची एक प्रक्रिया आहे. पोलिसांकडून सर्व तपासणी करतात. हा सोपा विषय नाही. शस्त्रपरवाना देताना संबंधित व्यक्तीची समाजात त्याची इभ्रत असावी लागते. निलेश घायवळचा तो सख्खा भाऊ आहे. अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत. पोलिसांनी तसा अहवालही दिला होता. पुरव्याभावी झालेली सुटका म्हणजे निर्दोष सुटका नाही. योगेश कदमांकडे अपील आले. तेव्हा पोलिसांनी सर्व बाजू मांडून तो गुन्हेगार असल्याचे सांगितले. पैसे ने आण करण्यासाठी याला शस्त्र हवे होते.…खुनाचा गुन्हा होता त्याच्यावर, अशा माणसाला गृहराज्यमंत्री शस्त्र परवाना देतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp