सचिन घायवळ शस्त्रपरवाना प्रकरण तापलं, मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी; सुषमा अंधारे आक्रमक

मुंबई तक

Sushma Andhare on Yogesh Kadam, Mumbai : निलेश घायवळ प्रकरण तापलं, मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी; सुषमा अंधारे आक्रमक

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी

point

निलेश घायवळ प्रकरणात ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Sushma Andhare on Yogesh Kadam, Mumbai : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या लंडनला फरार आहे. त्याच्या पासपोर्टवरून वाद सुरु असतानाच आता त्याच्या भावाला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवीन राजकीय चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे, हा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा खुलासा झाल्यानंतर विरोधकांकडून टीकेचा सूर उमटला असताना, गृहराज्यमंत्री कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला सर्व आवश्यक पडताळणीनंतरच शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, सचिन घायवळ शस्त्रपरवाना प्रकरणात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा : पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले अन् जखमांवर चटणी टाकली, भाजलेला तो ओरडला अन् ..

ठाकरेंच्या शिवसेनेकडून योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी 

सुषमा अंधारे म्हणाल्या, काल कुख्यात गुंड निलेश घायवळ चा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता. तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला. योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे सबब योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही तात्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. 

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, 1) कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 118 /2010 भा द वि कलम 143 147 ,148, 149 , 307,  427,  428 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3 4 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 एक ,135 ,142 अन्वये गुन्हा दाखल आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp