पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले अन् जखमांवर चटणी टाकली, भाजलेला तो ओरडला अन् ..
Crime News : पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले अन् जखमांवर चटणी टाकली, भाजलेला तो ओरडला अन् ..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले अन् जखमांवर चटणी टाकली

पोलिसांकडून पत्नीवर गुन्हा दाखल
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पत्नीने रात्री झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतले आहे. यावरच तिचे समाधन झाले नाही. त्यानंतर तिने त्याच्या जखमांवर चटणी टाकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. औषध कंपनीत काम करणारा दिनेश (वय 28) हा या हल्ल्यात गंभीररीत्या भाजला असून त्याला तत्काळ सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या शरीराचा सुमारे 20 टक्के भाग भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या तो अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
हेही वाचा : हिंगोली : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, संतापलेल्या पतीने डोक्यात हातोडा घातला अन् स्वत:ही गळफास घेतला
पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले अन् जखमांवर चटणी टाकली
2 ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या या घटनेबाबत दिनेशने दिलेल्या जबाबानुसार, तो रोजच्या प्रमाणे कामावरून घरी आला, जेवण केले आणि पत्नी व आठ वर्षांच्या मुलीसह झोपला. पहाटे तीनच्या सुमारास अचानक त्याला तीव्र जळजळ जाणवली. डोळे उघडले असता पत्नी साधना त्याच्या अंगावर उकळते तेल ओतत असल्याचे दिसले. काही क्षणातच तिने त्याच्या भाजलेल्या जागी तिखट टाकले. त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला असता पत्नीने धमकी दिली की, ‘आवाज केलास तर आणखी तेल ओतेन.’ जळजळीत वेदनेने दिनेश आरडाओरड करू लागला आणि त्याच्या ओरडण्याने शेजारी तसेच घरमालक धावून आले.
हेही वाचा : Viral: तिने बिकिनी घातली अन् 'तो' व्हिडिओ केला शेअर, सोशल मीडियावर राडा सुरू झाला ना भाऊ!