Viral: तिने बिकिनी घातली अन् 'तो' व्हिडिओ केला शेअर, सोशल मीडियावर राडा सुरू झाला ना भाऊ!
Aged Woman Bikini Viral News: एका वृद्ध महिलेने बिकिनी आणि बोल्ड स्विमसूट परिधान केल्याने तिच्या नेटीझन्स बरीच टीका करत आहे. पण सध्या ही महिला सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
ADVERTISEMENT

डॉली बर्ड (Dolly Bird) नावाची एक महिला सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिचं लोकप्रिय होण्याचं आणि चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे तिची बोल्ड आणि एकदम हॉट स्टाईल. आता तुम्ही म्हणाल की, यामध्ये काय नवीन आहे? कारण अनेक तरुणी या बोल्ड आणि हॉट अदांमधील त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ हे सोशल मीडियावर सर्रास शेअर करतात. पण इथेच खरी गंमत आहे. डॉली बर्ड ही काही कॉलेजवयीन तरूणी किंवा मध्यमवयीन महिला नाही. तर ती आहे तब्बल 60 वर्षांची आजी.
60 वर्षांहून अधिक वयाच्या डॉलीने अलीकडेच इंटरनेटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यानंतर सोशल मीडियावर ती प्रचंड चर्चेत आली. या व्हिडिओमध्ये डॉली ही बिकिनीमध्ये (स्ट्रॅपलेस व्हाइट स्विमसूट) तिची फिगर आणि तिचे टोन्ड लेग्स फ्लाँट करत आहे
बिकिनी परिधान केली म्हणून टीका
'हवामान बदलण्यापूर्वी' बाथिंग सूट घालण्याची शेवटची संधी असं कॅप्शन देत वृद्ध डॉलीने तिचा स्विमसूटमधील व्हिडिओ हा इंस्टाग्रामवर शेअर केला. परंतु तिचा हा बोल्ड आणि हॉट अवतार नेटिझन्सनच्या मात्र पचनी पडला नाही. त्यामुळे, डॉलीवर वाईट आणि लज्जास्पद अशी शेरेबाजी यूजर्स करत आहेत.
हे ही वाचा>> डोंबिवली: लग्न ठरलेल्या मावशीचा आणि 4 वर्षाच्या भाचीचा एकाच वेळी झालेला मृत्यू, सर्पदंश मृत्यूकांड प्रकरणाचा आता उडाला भडका
अनेकांनी ‘डेस्परेट अटेंशन सीकर’ असं म्हणत डॉलीवर टीका केली आहे. नेटिझन्सनी तिच्या वयाचा उल्लेख करत अत्यंत टोकदार टीका केली आहे. एका यूजर्सने तर थेट म्हटलंय, "तुला लाज वाटत नाही का?"