मुंबई : 'तो आला त्यानं पार्सल दिलं अन् माझ्या छातीला हात लावला', ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयचं वासनांध कृत्य CCTV मध्ये कैद

मुंबई तक

mumbai crime :  मुंबईसारख्या शहरात महिला, मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. कारण एका ब्लिंकीट डिलिव्हरी बॉयने एका महिलेला नको त्या ठिकाणी चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

ADVERTISEMENT

mumbai crime
mumbai crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईसारख्या शहरात महिला, मुली सुरक्षित आहेत का?

point

ब्लिंकीट डिलिव्हरी बॉयने महिलेला नको तिथं लावला हात

point

CCTV कॅमेऱ्यात कृत्य कैद

Mumbai Crime : मुंबईसारख्या शहरात महिला, मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. कारण एका ब्लिंकीट डिलिव्हरी बॉयने एका महिलेला नको त्या ठिकाणी चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. संबंधित महिलेनं डिलिव्हरी बॉयनं माझ्या छातीला स्पर्श केल्याचा धक्कादायक आरोप आहे. याप्रकरणात ब्लिंक इटनंही दिलगिरी व्यक्त केली आहे. 

हे ही वाचा : विवाहित जोडप्याने एकत्र आयुष्य संपवलं! "मम्मी कोणाशी तरी फोनवर बोलायची..." अखेर मुलांनी पोलिसांनी सांगितली 'ती' गोष्ट

नेमकं प्रकरण काय? 

मुंबईतल्या एका महिलेनं व्हिडिओ पोस्ट केला असून ब्लिंकीट बॉयने आपल्या छातीला चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला होता. महिलेचं म्हणणं आहे की, तो आला आणि त्याने मला पार्सल  दिलं आणि त्याने माझ्या छातीला हात लावला. तरुणाने ब्लिंक इटचा गणवेश परिधान केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. तेव्हा पार्सल देत असतानाच त्याने असे कृत्य केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. 

ब्लिंक इटनं व्यक्त केली दिलगिरी

ब्लिंक इटवरून ऑर्डर केल्यानंतर मला असा वाईट अनुभव आला. हे केलेलं कृत्य अतिशय चुकीचं आणि वाईट आहे. यावर ब्लिंक इटने काही तरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे, असं महिलेनं म्हटलं आहे. दरम्यान, ब्लिंक इटने या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. 

संबंधित एकूण कृत्याचा व्हिडिओ महिलेनं शेअर केल्यानंतर ब्लिंक इटने घटनेची दखल घेतली. त्यानंतर वाईट कृत्य करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला काढून टाकण्यात आले आणि महिलेची माफी मागितली. तसेच ब्लिंक इट ड्रायव्हरचं कंत्राट रद्द करण्यात आले. जे घडलं त्याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती करू शकता, असे ब्लिंक इटनं म्हटलंय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp