वासनांध तरुणाने ‘त्या’ मुलीलाही सोडलं नाही! DM, SP निवासस्थानाजवळ नेलं अन्...

डीएम, एसपी, जिल्हा न्यायाधीश आणि इतर अनेक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सुमारे 800 मीटर अंतरावर मुकबधीर तरुणीवर अत्याचार झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वासनांध तरुणाने मूकबधिर मुलीलाही सोडलं नाही! निर्जन शेतात नेलं अन्...
वासनांध तरुणाने मूकबधिर मुलीलाही सोडलं नाही! निर्जन शेतात नेलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मूकबधिर तरुणीला शेतात नेलं अन् केलं घृणास्पद कृत्य

point

डीएम, एसपी निवासस्थानाजवळ घडला धक्कादायक प्रकार

Rape Case: उत्तर प्रदेशातील बलरामपुर जिल्ह्यात देहात कोतवाली परिसरात सोमवारी रात्री 22 वर्षीय मूकबधिर तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बहादुरपुर पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच ही घटना घडल्याची माहित आहे. डीएम, एसपी, जिल्हा न्यायाधीश आणि इतर अनेक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सुमारे 800 मीटर अंतरावर मुकबधीर तरुणीवर अत्याचार झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

निर्जन शेतात नेऊन केला अत्याचार 

कुटुंबियांच्या मते, सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या आजोळहून तिच्या घरी परतत होती. तिचे घर डीएम निवासस्थानाजवळ असल्याचं सांगितलं जात आहे. घरी परतत असताना वाटेत एका तरुणाने तिला जबरदस्तीने उचलून एका निर्जन शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलगी बोलू शकत नसल्यामुळे ती त्यावेळी कोणताच आवज करू शकत नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. 

पीडिता मानसिकदृष्ट्या त्रस्त

पीडित तरुणी बराच काळ घरी न पोहचल्याने कुटुंबियांनी जवळपास 1 तास तिचा शोध घेतला. तपासादरम्यान, ती शेतात आक्षेपार्ह स्थितीत आढळली. त्यानंतर तिला ताबडतोब जिल्हा महिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पीडितेवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे, परंतु ती मानसिकदृष्ट्या ग्रस्त आहे. संबंधित घटनेचे 14 सेकंदांचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. यामध्ये मुलगी पळून जात असताना दिसत आहे. 

हे ही वाचा: NASA च्या इंटर्नने चंद्राचा तुकडा चोरला..बेडखाली ठेऊन गर्लफ्रेंडसोबत रोमान्स केलं अन् नंतर सगळंच व्हायरल झालं!

नातेवाईकांनी केले आरोप

हा व्हिडिओ एसपी निवासस्थाना जवळील कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बहादुरपूर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला संबंधित घटनेची कल्पना देखील मिळाली नाही. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि म्हटले की, "इतक्या संवेदनशील परिसरात, जिथे जिल्ह्यातील उच्च अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत, तिथे मुलीवर बलात्कार होतो आणि पोलिसांना कल्पनाही मिळू नये?" दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

हे ही वाचा: बहिणीकडून राखी बांधली अन् रात्री तिच्यासोबत केलं घाणेरडं कृत्य... एवढ्यावर भागलं नाही म्हणून फाशी...

तसेच, पोलीस अधिकारी विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेची माहिती मिळताच कोतवाली देहात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच पोलिसांचा तपास सुरु करण्यात आला आहे. पोलीस तपासात, अंकुर वर्मा आणि हर्षित पांडे या दोघांची नावे समोर आली. या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जात असल्याची पोलिसांनी माहिती दिली.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp