बहिणीकडून राखी बांधली अन् रात्री तिच्यासोबत केलं घाणेरडं कृत्य... एवढ्यावर भागलं नाही म्हणून फाशी...
एक मुलगी तिच्या काकाच्या घरी रक्षाबंधन साजरा करुन घरी परतली होती. त्याच रात्री तिच्या चुलत भावाने दारूच्या नशेत पीडितेवर बलात्कार केला.

बातम्या हायलाइट

रक्षाबंधन साजरा केला अन् त्याच रात्री भावाने बहिणीवर केला अत्याचार

दारूच्या नशेत चुलत बहिणीवर बलात्कार अन् नंतर निर्घृणपणे हत्या..
Crime news: उत्तर प्रदेशातील औरैयामधून एक संतापजनक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील बिधूना कोतवाली परिसरातील कक्षपुरा गावात 9 ऑगस्ट रोजी एक मुलगी तिच्या काकाच्या घरी रक्षाबंधन साजरा करुन घरी परतली होती. तिची आई आणि बहिणी नोएडाला गेल्यामुळे ती घरी एकटी होती. त्यावेळी तिचे वडील घराबाहेर झोपडीत झोपले होते. त्यादिवशी मुलीचा चुलत भाऊ सूरजीत दारुच्या नशेत होता. त्याने खूप दारू प्यायली होती. दारुच्या नशेत त्याने बहिणीसोबत असं कृत्य केलं, जे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसेल.
बहिणीवरच केला बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरजीत रात्री शौचास जाण्यासाठी शेतात गेला होता. तिथून घरी परत येताना तो भिंतीवरून उडी मारून पीडितेच्या घरात घुसला. त्यावेळी त्याने भरपूर दारू प्यायली होती. त्याने दारूच्या नशेत पीडित तरुणीवर बलात्कार केला. आरोपीच्या घाणेरड्या कृत्यांना मुलीने विरोध केला आणि जोरजोरात ओरडू लागली. त्यामुळे कोणताच विचार न करता सुरजीतने तिचा गळा दाबून खून केला. बहिणीची हत्या आत्महत्येसारखी भासवण्यासाठी आरोपीने त्याला फासावर लटकवलं. मग तो शांतपणे त्याच्या खोलीत गेला आणि काही घडलंच नसल्याचा आव आणला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत जाऊन गपचूप झोपून गेला.
हे ही वाचा: दोन मुलांच्या विधवा आईचा बॉयफ्रेंडसोबत रोमान्स! अचानक मुलाने सगळंच पाहिलं अन् नंतर घडलं...
फाशीवर लटकलेल्या अवस्थेत..
दुसऱ्या दिवशी सकाळी, पीडितेच्या वडिलांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण, खोलीतून मुलीचा कोणताच प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला. मात्र, खोलीतील दृश्य पाहून ते जोरात ओरडले. त्यांची मुलगी फाशीवर लटकलेल्या अवस्थेत आढळली. परंतु, तापासात पोलिसांना घरात रक्ताचे डाग दिसले. यामुळे हे आत्महत्या नसून हत्येचं प्रकरण असल्याचं पोलिसांना संशय आला.
हे ही वाचा: 15 वर्षांची नात अन् 70 वर्षीय आजोबाची फिरली नियत... गरोदर राहिली आणि नंतर मुलीला दिला जन्म
फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये खुलासा..
पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली. सूरजीत नेहमी कुटुंबियांना दिशाभूल करत राहिला, जेणेकरुन त्याच्यावर कोणाचा संशय येणार नाही. चौकशी सुरू असताना आरोपी तरुण देखील तिथे उपस्थित होता आणि आपण काहीच केलं नसल्याचं भासवत होता. पण पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघडकीस आल्यावर आरोपीचे कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यावर रक्ताचे डाग होते आणि फॉरेन्सिक टेस्ट केल्यानंतर रक्ताचा नमुना मुलीच्या रक्ताशी मॅच झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.