दोन मुलांच्या विधवा आईचा बॉयफ्रेंडसोबत रोमान्स! अचानक मुलाने सगळंच पाहिलं अन् नंतर घडलं...
उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पतीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित महिलेचं दुसऱ्याच तरुणासोबत सूत जुळलं. मात्र, एके दिवशी महिलेच्या प्रियकराने तिच्या मुलाची हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. हत्येमागचं नेमकं कारण काय?

बातम्या हायलाइट

पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे दुसऱ्याच पुरुषासोबत प्रेमसंबंध

मुलाने पाहिलं आईला आक्षेपार्ह स्थितीत अन् नंतर...
Extra Marital Affair: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पतीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित महिलेचं दुसऱ्याच तरुणासोबत सूत जुळलं. मात्र, सोमवारी (11 ऑगस्ट) महिलेच्या प्रियकराने तिच्या मुलाची हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आणि त्यानंतर त्याला अटक सुद्धा करण्यात आली. परंतु, एके दिवशी संबंधित आरोपीने पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याच्या पायात गोळी झाडली, ज्यामुळे तो जखमी झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.
मुलाने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं म्हणून...
घटनेत मृत पावलेल्या मुलाचं नाव सूरज असं असून तो केवळ 10 वर्षांचा असल्याची माहिती आहे. सूरजने त्याची आई सोना शर्माला तिचा प्रियकर फैजानसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. मुलाला प्रेमसंबंधाबद्दल कळल्याने महिलेच्या संतापलेल्या प्रियकराने सूरजची निर्घृणपणे हत्या केली. तसेच, पोलिसांना मृताच्या आईवर सुद्धा संशय असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
संबंधित घटना रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मच्छरहट्टा परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. मंगळवारच्या (12 ऑगस्ट) संध्याकाळी येथे राहणारा 10 वर्षीय सूरज शर्मा नावाचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईनेच पोलीस ठाण्यात दाखल केली.
हे ही वाचा: दोघींना स्विमिंग पूलजवळ नेलं अन् सामूहिक अत्याचार... निष्पाप मुलींसोबत घडलं भयानक...
पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न
तपासादरम्यान, पोलिसांना बावनबिघा येथील झुडपात सूरजचा मृतदेह सापडला. सूरजची गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज लावला. मध्यरात्री पोलिसांनी आरोपी फैजानला अटक केली. या प्रकरणासंदर्भात डीसीपी गौरव बंशवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर त्याने पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, पोलिसांना नाईलाजाने गोळीबार करावा लागला आणि त्यात फैजानच्या उजव्या पायाला गोळी लागली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यावेळी चौकशी केली असता फैजानने त्याचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा: मोठी बातमी: बच्चू कडूंना 'ते' प्रकरण अखेर भोवलं, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा!
संबंधित गुन्ह्यासंदर्भात फैजानचा मित्र असलेल्या रशीद नावाच्या व्यक्तीचीही चौकशी केली जात आहे. तसेच, सूरजच्या आईवर सुद्धा पोलिसांचा संशय असल्याचं सांगण्यात येत आहे. सोना शर्माच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालं असून पतीच्या मृत्यूनंतर ती फैजानसोबत प्रेमसंबंधात अडकली.