कोल्हापूर : कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल
Kolhapur News : बसवन बागेवाडी येथील रहिवासी शिवनगौड बिरादार यांनी बसवन बागेवाडी पोलिस ठाण्यात काडसिद्धेश्वर महाराजांविरोधात तक्रार दिली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोल्हापूर : कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल
गुन्हा शून्य क्रमांकाने जत पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलाय
जत (जि. सांगली) : बिळूर (ता. जत) येथे झालेल्या एका प्रवचनादरम्यान लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कणेरी (जि. कोल्हापूर) येथील मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली असून समाजातही संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाची सुरुवात कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात झाली. बसवन बागेवाडी येथील रहिवासी शिवनगौड बिरादार यांनी बसवन बागेवाडी पोलिस ठाण्यात काडसिद्धेश्वर महाराजांविरोधात तक्रार दिली होती. त्यांच्या फिर्यादीची नोंद करून हा गुन्हा शून्य क्रमांकाने जत पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला. जत पोलिसांनी तक्रार मिळताच प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा : बीड: "तू लय माजलास..." जातीवाचक शिवीगाळ करत ग्रामरोजगार सेवकाला बेदम मारहाण! दोन्ही पाय मोडले अन्...
फिर्यादीत नमूद केले आहे की, 9 नोव्हेंबर रोजी बिळूरमधील विरक्त मठ आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात महाराजांनी केलेल्या कथित वक्तव्यांमुळे लिंगायत समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली. समाजात द्वेष निर्माण करणे, शांततेत व्यत्यय आणणे आणि एकोप्याला बाधा निर्माण करणे असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लिंगायत समाजात या वक्तव्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.










