Maharashtra Weather: अनेक जिल्ह्यात येणार थंडीची लाट, हवामान विभागाचा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत चढ-उतार सुरू आहेत. काही भागात गारठा वाढला असून काही ठिकाणी कमाल तापमानात देखील वाढ झाल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात हवामानाची स्थिती
विदर्भाची स्थिती कशी असेल?
Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत चढ-उतार सुरू आहेत. काही भागात गारठा वाढला असून काही ठिकाणी कमाल तापमानात देखील वाढ झाल्याचं दिसतंय. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळेत जाणवणारी थंडी पुन्हा तीव्र होत आहे.
तर, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागामध्येही थंडीचा जोर वाढलाय. हवामान खात्याकडूनही थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. पुढचे काही दिवस मुंबईत किमान तापमान 19°C च्या आसपास असेल तर दिवसा 30–31°C राहण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये थंडी मुंबईपेक्षा जास्त असून तापमान 16–18°C पर्यंत खाली जाईल. रायगड–रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागात थंडी स्थिर असून किमान तापमान 17–19°C दरम्यान राहील. दिवसा या जिल्ह्यांत तापमान 30–32°C पर्यंत जाईल. आकाश स्वच्छ, गार वारा आणि संध्याकाळी पुन्हा गारवा, अशी स्थिती पुढच्या काही दिवसात असणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.
कोकण विभाग आणि आसपासच्या शहरांचे हवामान
तर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण या भागात हवामान स्थिर असून सकाळी हलका गारवा असेल. ठाणे आणि नवी मुंबईत किमान तापमान 18–19°C, तर दिवसा 30–32°C राहील. कल्याण–डोंबिवली भागात तापमान 16–18°C च्या आसपास गेल्यामुळे सकाळी थोडी जास्त थंडी जाणवेल. तर दुपारी वातावरण उबदार राहील.
पुणे शहरातील हवामान
तर, पुणे - बारामती या भागांमध्ये सुद्धा हवामान कोरडं असेल. पुण्यात सध्या थंडीचा जोर तुलनेने कमी आहे. सकाळचं तापमान 15–17°C च्या आसपास असून दिवसा 29–31°C राहील. दिवसभर वातावरण सामान्य आणि स्थिर असेल.










