सप्तशृंगी गडावर निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 800 फूट खोल दरीत कार कोसळली, 6 जणांचा दुर्दैवी अंत
Nashik accident : सप्तशृंगी गडावर निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नाशिक जिल्ह्यात मन सून्न करून टाकणारी धक्कादायक घटना
सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार खोलदरीत कोसळली
Nashik Accident : नाशिक जिल्ह्यात मन सून्न करून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची इंनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. एमएच15 बिएन 555 या कारचा घाटात भवरी धबधब्याजवळ ओव्हर टेक करण्याच्या नादात अपघात झाला. कार घाटाच्या आजूबाजुचे कठडे तोडून 800 फीट खोल दरीत कोसळली, या अपघातात पटेल कुटुंबातील असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : जय पवारांच्या लग्नाला सुप्रिया सुळेंची दांडी, भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनासोबत थिरकल्या, Video व्हायरल
मृतांची नावे समोर
कीर्ती पटेल (वय 50) रसीला पटेल (वय 50) विठ्ठल पटेल (वय 65) लता पटेल (वय 60) पचन पटेल (वय 60) आणि मणिबेन पटेल (वय 60) अशी अपघातात मृतांची नावे आता समोर आली आहे.
800 फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने बचावकार्यात अडथळा
घटनास्थळी पोलीस, सप्तशृंगी गड आपत्ती व्यवस्थापन टीम, सप्तशृंगी गड ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असून साधारण 800 फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : इचलकरंजीत तरुणाचा खून, हत्येनंतर हल्लेखोराचं 'सूरज ढलता है, डुबता नही' स्टेट्स, हादरवणारं प्रकरण
अजून पर्यंत 800 फीट खोल दरीतून मृतदेह वर काढता आले नसून नाशिकवरून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले, स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका केली असून अपघाताच्या ठिकाणी असलेल्या वळणावरील सदोष रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला.










