इचलकरंजीत तरुणाचा खून, हत्येनंतर हल्लेखोराचं 'सूरज ढलता है, डुबता नही' स्टेट्स, हादरवणारं प्रकरण

मुंबई तक

Kolhapur crime : कोल्हापुरातील इचलकरंजी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा प्रकार 7 डिसेंबर रोजी उघड झाला आहे.

ADVERTISEMENT

Kolhapur crime
Kolhapur crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इचलकरंजी काय घडलं? 

point

कॉलेजच्यामागील ओढ्यात तरुणाचा मृतदेह

point

खूनानंतर 'सूरज ढलता है, डुबता नही', स्टेट्स 

Kolhapur crime : कोल्हापुरातील इचलकरंजी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा प्रकार 7 डिसेंबर रोजी उघड झाला. सुहास सतीश थोरात (वय 19) असे तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी निपाणीजवळील देवचंद कॉलेज येथील मागील ओढ्याखाली नेले आणि कोयत्याने सपावप वार करत संपवलं. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी हा संशयित असल्याचे सांगण्यात येत आहे. संशयिताने खूनाचा कबुलीनामा दिला आहे. खूनानंतर आरोपीने स्टेट्सवर 'सूरज ढलता है, डुबता नही', अशा आशय ठेवला होता. यामुळे पोलिसांनी अधिकच संशय व्यक्त केला. 

हे ही वाचा : जय पवारांच्या लग्नाला सुप्रिया सुळेंची दांडी, भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनासोबत थिरकल्या, Video व्हायरल

नेमकं काय घडलं? 

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोटारसायकल दुरुस्त करायची असल्याचं कारण सांगून तिघांनी सुहासवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचे काम केले. या प्रकरणात आरोपींवर पोलिसांनी अपहरण, खूनासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये ओंकार अमर शिंदे (वय 25), ओंकार रमेश कुंभार (वय 23) या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या  हत्या प्रकरणात पोलिसांनी शोधमोहिम सुरु ठेवल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं. 

हत्या करण्यात आलेल्या सुहासच्या वडिलांनी म्हणजेच बळीराम थोरात (वय 50) यांनी आरोपीविरोधात फिर्याद नोंदवली. सुहास एका गाड्यांच्या शोरुममध्ये काम करत होता. संशयिताने 5 डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी सहासचे घर गाठले. नंतर त्याला मोटारसायकल रिपेअरिंगच्या बहाण्याने दुसऱ्या गावात जाऊ असे सांगितलं. सुहास दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घरी जेवन करून पुन्हा कामावरती जाण्यास निघाला होता. 

मुलाच्या जीवाला धोका असल्याची भीती

दुपारी दोनच्या सुमारास वडिलांनी फोनद्वारे संपर्क केला असता, सुहास कामावर आला होता. नंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास संशयित तिघेजण सुहासकडे आले. नंतर मोटारसायकल दुरुस्तीचा बहाणा करू लागले होते. नंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सतीश थोरात यांनी सुहासला फोन केला. तेव्हा आपल्या मुलाच्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त करत पोलीस ठाणे गाठले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp