जालना हादरलं! पैशाच्या वादातून महिलेची हत्या, मृतदेह शेतात आढळला, पोलीस चक्रावले
Jalna Crime : पैशाच्या देवाणघेवाणीतूनच एका महिलेची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पैशांवरून वाद पेटला
जालन्यात महिलेला संपवलं
Jalna Crime : पैशांमुळे अनेक नाती तुटल्याच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यात घडली आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतूनच एका महिलेची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आता समोर आलं आहे.
हे ही वाचा : जय पवारांच्या लग्नाला सुप्रिया सुळेंची दांडी, भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनासोबत थिरकल्या, Video व्हायरल
नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव शरद शिवाजी राऊत, तर मयत महिलेचे नाव उषाबाई भास्कर सदाशिवे (वय 40 वर्ष) असे आहे. ही घटना भोकरदन तालुक्यातील खडकी शिवारात घडली. उषाबाई सदाशिवे यांचा मृतदेह खडकी शिवारातील कापसाच्या शेतात आढळून आल्याचे वृत्त आहे. स्थानिकांनी याची माहिती तातडीने हसनाबाद पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा उलगडा केला.
पैशांवरून वाद आणि महिलेची हत्या
पोलिसांच्या तपासातून ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. तपासात मयत झालेल्या महिलेच्या चांदई टेपले येथील शरद शिवाजी राऊत चांदई टेपले यांच्यातच पैशांवरून वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल नंबर मिळवून लोकेशन मिळवले. त्याचं लोकेशन हे जावळेवाडी शिवारातील घर असल्याचे दिसून आले होते. त्याचक्षणी पोलिसांनी चक्र फिरवत घटनास्थळी धाव घेतली. या चौकशीदरम्यान आरोपीच्या पोलिसांचा कबुलीनामा दिला.
हे ही वाचा : ठाण्यात केकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं, महिलेला बोलावून कोर्टाजवळ केला सामूहिक अत्याचार, बर्थडे बॉय फरार
महिलेचा स्कार्फने गळा आवळून हत्या
पैशाच्या वादातूनच हा वाद झाला आणि आरोपीची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे. आरोपी महिलेचा स्कार्फने गळा आवळून हत्या केल्याची मन हेलावणारी घटना आहे. या घटनेनं घटनास्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.










