ठाण्यात केकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं, महिलेला बोलावून कोर्टाजवळ केला सामूहिक अत्याचार, बर्थडे बॉय फरार
Thane crime : ठाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाढदिवसाच्या नावाखाली केकेमध्ये गुंगीचं औषध टाकून एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस
वाढदिवसाच्या नावाखाली केकेमध्ये गुंगीचं औषध
महिलेवर ठाणे नगर पोलीस अत्याचार
Thane Crime : ठाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाढदिवसाच्या नावाखाली केकेमध्ये गुंगीचं औषध टाकून एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना 25 ऑगस्ट रोजी घडली.
हे ही वाचा : जय पवारांच्या लग्नाला सुप्रिया सुळेंची दांडी, भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनासोबत थिरकल्या, Video व्हायरल
महिलेवर सामूहिक अत्याचार
ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आरोपी हिरालाल केदारला अटक करण्यात आली आहे.
महिलेनं ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
रवी पवार या पुरुषाचा वाढदिवस होता, त्याच दिवशी ही घटना घडली. दरम्यान, आरोपी रवी पवार हा फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची 5 डिसेंबर रोजी महिलेनं ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच दोन्ही आरोपी कथित युट्युबर पत्रकार म्हणून या अगोदर देखील त्यांच्यावरती गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा : इंदापुरात ट्रॅक्टर-ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ट्रॅक्टर चालकाचा आगीत होरपळून दुर्दैवी अंत
मालेगावात घटनेची पुनरावृत्ती
अशाच घटनेची पुनरावृत्ती ही मालेगावातही घडली आहे. एका 13 वर्षीय मतिमंद मुलीवर एका 55 वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची लाज आणणारी घटना आहे. या घटनेनं मालेगाव हादरून गेले आहे. या प्रकरणातील आरोपी दीपक धनराज छाजेड या संशयित आरोपीने फूस लावून त्याच्या स्कुटीवर बसवून एका पीडितेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी आरोपीवर पोलीस ठाण्यात अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.










