गडचिरोली : परिचारिकेची वेतनवाढ रोखली, शरीरसुखाच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून छळ; शेवटी टोकाचा निर्णय..
Gadchiroli Crime : परिचारिकेची वेतनवाढ रोखली, शरीरसुखाच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून छळ; शेवटी आत्महत्येच्या प्रयत्नाने गडचिरोलीमध्ये खळबळ
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गडचिरोली : परिचारिकेची वेतनवाढ रोखली
शरीरसुखाच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून छळ; शेवटी टोकाचा निर्णय..
Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका परिचारिकेने दीर्घकाळ चाललेल्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने दोन वर्षांपासून सतत मानसिक त्रास देत अश्लाघ्य मागण्या केल्या, तसेच तिची वेतनवाढ मुद्दाम रोखून ठेवली, असा गंभीर आरोप तिच्या पतीने केला आहे. 6 डिसेंबरच्या सायंकाळी या दबावाला कंटाळून तिने विष पिल्याचे माहिती समोर आलीये. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
घटनेच्या दिवशी परिचारिका नेहमीप्रमाणे दिवसभर कर्तव्य बजावत होती. संध्याकाळी ती मुलचेरा येथील घरी परतल्यानंतर ती प्रचंड तणावात दिसत असल्याचे तिच्या पतीने सांगितले. घरातील जेवण आटोपल्यानंतर पतीला डुलकी लागताच तिने विषारी द्रव प्राशन केले. वेळेत ही बाब लक्षात आल्याने पतीने तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : राज्यातील 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी थकवले, खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्याचे 9 कोटी थकीत
या परिचारिकेचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल आरोग्य विभागात आधीपासूनच नाराजी असल्याचे समोर आले आहे. पाच महिन्यांपूर्वी मुलचेरा तालुक्यात डेंगूच्या साथीच्या काळात उपचारातील निष्काळजीपणामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही त्याच अधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले होते. मात्र वरिष्ठांच्या पाठबळामुळे कोणतीही कारवाई न झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू होती. त्यामुळे या नव्या प्रकरणाने कर्मचाऱ्यांमध्ये रोष अधिक वाढला आहे.










