पालघरमध्ये रक्षक झाले भक्षक, महिलेला चौकशीसाठी बोलावलं, पोलीस ठाण्यातच... हवालदार झाला राक्षस

मुंबई तक

palghar crime : पालघमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. चौकशीसाठी बोलवलेल्या महिलेवर एका हवालदारानेच लैंगिक अत्याचार केल्याची घडली आहे.

ADVERTISEMENT

palghar crime
palghar crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पालघमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना

point

हवालदाराने महिलेवर केला अत्याचार

palghar crime : पालघमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. चौकशीसाठी बोलवलेल्या महिलेवर एका हवालदारानेच लैंगिक अत्याचार केल्याची मन हेलावणारी घटना घडली आहे. हा संताप आणणारा प्रकार हा पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या आवारात घडली आहे. शरद बोगाडे असं हवालदाराचे नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा : पुणे-नगर रस्त्यावरील प्रवास सुसाट होणार, तासाभराचं अंतर वाचणार, महत्त्वाचा निर्णय जारी

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, ही घटना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यात घडली आहे. या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेवर कासा पोलीस ठाण्यातील हवालदार शरद बोगाडे याने लैंगिक अत्याचार केल्याचा पीडितेनं गंभीर आरोप केला आहे. 

आरोपीवर गुन्हा दाखल

या प्रकरणात आता डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी हवालदार बोगाडेवर लैंगिक अत्याचारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी ही कासा पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आली.  दरम्यान, या प्रकरणात आता हवालदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता समोर आला आहे. 

हे ही वाचा : मुंबईत तरुणीला दिदी अशी हाक मारली, नंतर तिला भररस्त्यातच तरुणाने पॉर्न व्हिडिओ दाखवले, लाज आणणारा प्रकार

या प्रकरणी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी हवालदाराविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पोलीस पुढील चौकशीसाठी नियुक्ती करण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp