NASA च्या इंटर्नने चंद्राचा तुकडा चोरला..बेडखाली ठेऊन गर्लफ्रेंडसोबत रोमान्स केलं अन् नंतर सगळंच व्हायरल झालं!

NASA Shocking News Viral :  प्रेमात आकंठ बुडालेले अनेक लोक त्यांच्या प्रेयसी किंवा बायकोला चंद्रावर घेऊन जाण्याचं वचन देतात. तुझ्या प्रेमासाठी चंद्राला जमिनीवर आणतो किंवा चंद्र तोडून आणतो, असंही प्रॉमिस करतात.

NASA Shocking Viral News
NASA Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेमासाठी चोरला होता लूनर रॉक्स

point

बेडरूममध्ये ठेवला होता चंद्राच तुकडा अन् नंतर केला रोमान्स

point

अशी केली चंद्राच्या तुकड्याची चोरी

NASA Shocking News Viral :  प्रेमात आकंठ बुडालेले अनेक लोक त्यांच्या प्रेयसी किंवा बायकोला चंद्रावर घेऊन जाण्याचं वचन देतात. तुझ्या प्रेमासाठी चंद्राला जमिनीवर आणतो किंवा चंद्र तोडून आणतो, असंही प्रॉमिस करतात. अशाच प्रकारचं एक भन्नाट प्रकरण व्हायरल झालं आहे. नासाच्या लॅबमध्ये इंटर्न म्हणून काम करणाऱ्या एका मुलानं, चंद्रावरून आणलेले तुकडे चोरले आणि ते बेडखाली ठेऊन गर्लफ्रेंडसोबत रोमान्स केला. दरम्यान, या लूनर रॉकची किंमत जवळपास 21 मिलियन डॉलर इतकी आहे. 

नासाच्या लॅबमधून लूनर रॉक चोरणाऱ्या तरुणाचं नावं रॉबर्ड थार्ड असं आहे. LA Times ला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्टने सांगितलं की, तो नासामध्येच काम करणाऱ्या टिफनीवर प्रेम करत होता. प्रेमात पडलेल्या रॉबर्टला त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचं नातं अधिक रोमॅन्टिक करण्यासाठी चंद्रावर रोमान्स करण्याची आयडिया सूचली. त्यासाठी त्याने प्लॅन बनवला. 

प्रेमासाठी चोरला होता लूनर रॉक्स

रॉबर्टने नासाच्या लॅबमध्ये चंद्रावरून आणलेले तुकडे चोरले. याविषयी त्याने त्याची गर्लफ्रेंड टिफनी फाऊलरलाही सांगितलं होतं. दोघांनी मिळून चंद्राच्या तुकड्यांची चोरी करण्याचा प्लॅन केला होता. 

हे ही वाचा >> दोघींना स्विमिंग पूलजवळ नेलं अन् सामूहिक अत्याचार... निष्पाप मुलींसोबत घडलं भयानक...

बेडरूममध्ये ठेवला होता चंद्राच तुकडा अन् नंतर केला रोमान्स

चंद्रावर असलेला तुकडा चोरी केल्यानंतर रॉबर्टने तो घरी नेला. चंद्रावरून आणलेला तुकडा त्याने बेडरूमच्या खाली लपवला. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडसोबत रोमान्स केला. रॉबर्टचं म्हणणं आहे की, यापेक्षा सुंदर दुसरं काहीही नसू शकतं. कारण यामध्ये चंद्रावर रोमान्स करण्यासारखी भावना आहे. 

अशी केली चंद्राच्या तुकड्याची चोरी

People च्या एका रिपोर्टनुसार, नासाचे माजी इंटर्न थाड रॉबर्ट्स (Thad Roberts) आणि त्याच्या मित्रांनी मिळून लूनर रॉक चोरण्यासाठी सेक्युरिटी कॅमेराला पुन्हा डिझाईन केलं. त्या लोकांनी नियोप्रीन बॉडीसूट परिधान केलं आणि लॅबच्या अॅक्सेससाठी ऑफिशियल बॅजही बनवलं.  या सर्व गोष्टींच्या मदतीने रॉबर्ट, फाऊलर आणि त्यांच्या एका मित्राने मिळून 17 पाऊंडचं लूनर रॉक चोरलं. ही घटना 2002 मध्ये घडली होती. रॉबर्टची गर्लफ्रेंड फाऊलर स्वत:ही स्पेस एजन्सीमध्ये काम करत होती. FBI आर्थिक फसवणूक म्हणून याप्रकरणाची नोंद केली आहे. 

हे ही वाचा >> pune crime : तरुण काकीला 'I Love You' म्हणाला, भावाची सटकली, नंतर भररस्त्यात हॉकी स्टिकने केली अमानुष मारहाण

हे वाचलं का?

    follow whatsapp