जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडीओ... नेमकी घटना काय?
जिल्हाधिकारी ऑनलाइन मीटिंगमध्ये उपस्थित असताना त्यावेळी एका व्यक्तीने स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरू केला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं?

बातम्या हायलाइट

जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये धक्कादायक घटना

मीटिंगदरम्यान, स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडीओ प्ले...
Viral Story: उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी ऑनलाइन मीटिंगमध्ये उपस्थित असताना त्यावेळी एका व्यक्तीने स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ सुरू केला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
मीटिंगमध्ये पॉर्न व्हिडीओ प्ले...
जिल्हाधिकारी ऑनलाइन मीटिंगमध्ये उपस्थित असताना एका व्यक्तीने स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ प्ले केला. जिल्हाधिकाऱ्यांची यावर नजर पडताच त्यांनी त्वरीत मीटिंग बंद केली आणि प्रकरणासंदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बीएसए रिद्धी पांडे, मुलभूत शिक्षण विभागातील सर्व शिक्षण अधिकारी आणि एनआयसी देखील उपस्थित होते.
आरोपीचं नाव आलं समोर
महाराजगंज जिल्हाधिकारी संतोष कुमार शर्मा यांच्याकडून मूलभूत शिक्षण विभागाशी संबंधित समस्यांची माहिती जाणून घेण्यासाठी एनआयसी सभागृहातून ई-चौपालद्वारे ऑनलाइन बैठक आयोजित केली गेली होती. या मीटिंगमध्ये जिल्हाधिकारी शिक्षक, पत्रकार आणि बैठकीतील इतर व्यक्तींसोबत संवाद साधत होते. यावेळी अधिकारी आणि सामान्य नागरिक आपल्या समस्या व्यक्त करत होते.
हे ही वाचा: 'दहीहंडी'चा सराव जीवघेणा ठरला! 11 वर्षीय गोविंदा थरावर चढला, पण तोल गेला अन्... मुंबईतील दुर्दैवी घटना
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
मीटिंगदरम्यान, जैसन नावाच्या एक व्यक्तीने अश्लील व्हिडीओ प्ले केला. त्यावेळी एनआयसीमधील टी.व्ही स्क्रीनर जिल्हाधिकाऱ्यांची नजर पडताच त्यांनी त्वरीत मीटिंग बंद केली. जिल्हाधिकाऱ्यांनी एसपी सोबत या प्रकरणाविषयी संवाद साधला आणि संबंधित प्रकरणाचा खोल तपास आणि कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. सध्या, या घटनेमुळे खळबळ माजली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: 8 महिन्यांच्या पुतणीवरच भाळला! घरात कोणीच नसताना केलं घृणास्पद कृत्य अन्... कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं...
या संपूर्ण प्रकरणाबाबत, गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की "जिल्हाधिकारी जनतेशी ऑनलाइन संवाद साधत होते. यादरम्यान, जैसन नावाच्या व्यक्तीने एक अश्लील व्हिडिओ ऑनलाइन प्ले केला. यासोबतच अर्जुन नावाच्या व्यक्तीने अपशब्द वापरले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे."