Maharashtra Weather: श्रावण सुरू झाला तरी पावसाचा लपंडाव सुरूच, पण आता सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी अलर्ट जारी
Maharashtra Weather Today: आज (12 ऑगस्ट 2025) रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई आणि पुण्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय हवामान खात्याने (IMD)आज (12 ऑगस्ट) साठी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता आणि हवामानाच्या परिस्थितीमध्ये मोठे बदल होऊ शकतात. कोकण, विदर्भ, आणि प. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, यासोबतच, काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो.
कोकण
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड: या जिल्ह्यांमध्ये 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा>> श्रावणी सोमवारी काळाची झडप! कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप दरीत कोसळली, 7 महिलांचा मृत्यू अन्..
मुंबई आणि उपनगर: मुंबईत 12 ऑगस्ट रोजी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.










