श्रावणी सोमवारी काळाची झडप! कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप दरीत कोसळली, 7 महिलांचा मृत्यू अन्..

Pune Kundeshawr Accident News :  पुण्यात खेड तालुक्यात आज सोमवारी 11 ऑगस्टला भीषण अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Kundeshwar Accident News
Pune Kundeshwar Accident News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोठ्या वळणावर पिकअप जीप झाली पलटी

point

जखमींना उपचारासाठी चांडोली रुग्णालयात केले दाखल

point

अपघात नेमका कसा घडला?

Pune Kundeshawr Accident News :  पुण्यात खेड तालुक्यात आज सोमवारी 11 ऑगस्टला भीषण अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. श्रावण महिन्याच्या तिसरा सोमवार असल्याने भाविक शिव मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. अशातच कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली आहे. महिला भाविकांनी भरलेलं पिकअप वाहन पटली झाल्याने 7 महिलांचा मृत्यू झालाय. ही घटना रविवारी उशिरा रात्री 1.15 वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात जवळपास 30 महिला भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 

मोठ्या वळणावर पिकअप जीप झाली पलटी

महिला भाविकांनी भरलेली पिकअप जीप चढाईवर असलेल्या मोठ्या वळणावर पलटली. ही जीप पाच ते सहावेळा पलटल्याने जवळपास 30 महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या खेड तालुक्यात पाईट कोहिंडे सीमेवर श्री श्रेत्र कुंडेश्वर येथे दरवर्षी भाविक मोठ्या संख्येत दर्शनासाठी येतात.

हे ही वाचा >>गल्ली ते दिल्लीत राडा, 300 हून अधिक खासदार सामील, महिला रणरागिणी खासदार भिडल्या, अखिलेश यादवांनी केला कहर

जखमींना उपचारासाठी चांडोली रुग्णालयात केले दाखल

परंतु, आज श्रावणी सोमवारी महिला भाविकांवर काळाने घाला घातला. महिलांनी भरेलेली पिकअप जीप चालकाचा नियंत्रण सुटल्याने पटली झाली आणि ती दरीत कोसळली. दरम्यान, या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला असून 30 महिला जखमी झाल्याचं समजते.

अपघातात जखमी झालेल्या महिलांना चांडोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आलीय.या भीषण अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रवास करावा, जेणेकरून रस्त्यावर अपघाताची समस्या निर्माण होणार नाही, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहेत. 

हे ही वाचा >> गँग ऑफ वासेपूर स्टाईलने हुमा कुरेशीच्या भावाचा खून, 'त्या' धारदार शस्त्राने केला हल्ला, मांस विक्रीचंही प्रकरण

हे वाचलं का?

    follow whatsapp