pune crime : तरुण काकीला 'I Love You' म्हणाला, भावाची सटकली, नंतर भररस्त्यात हॉकी स्टिकने केली अमानुष मारहाण
Pune Crime : एका तरुणाने आपल्या काकीला आय लव्ह यू म्हटल्याच्या रागातून काकाने आणि त्याच्या मित्राने पुतण्याचा खून केला.

बातम्या हायलाइट

पुणे तिथं काय उणे

पुतणा काकीलाच म्हणू लागला आय लव्ह यू

नेमकं काय घडलं?
Pune Crime : पुणे तिथं काय उणे हे वाक्य पुण्यासाठी अगदी समर्पक आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर असं बोललं जातं. मात्र, याच पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. एवढंच नाही,तर पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये अनैतिक संबंधाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याच घटनेमुळे अनेक गुन्हेही उघडकीस येऊ लागले आहेत. एका तरुणाने आपल्या काकीला आय लव्ह यू म्हटल्याच्या रागातून काकाने आणि त्याच्या मित्राने पुतण्याचा खून केला. ही घटना पुण्यातील चंदनननगर येथील आंबेडकरनगर वसाहतीत 12 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
हे ही वाचा : लेकीच्या संसारात सासू करायची लुडबुड, अखेर जावयाची सटकली, मटण तोडल्यासारखे केले 19 तुकडे, पोलिसांचीही टरकली
काकीला म्हणून लागला 'आय लव्ह यू' नंतर..
साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35) हा आंबेडकर वसाहतीतील रहिवासी आहे. त्याला दारूचा प्रचंड व्यसन होते. तो आपल्या काकीकडे गेला आणि तिला आय लव्ह यू म्हणू लागला. हा घडलेला प्रकार त्याचाच चुलत भाऊ म्हणजेच चुलतीचा मुलगा सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21) याला समजला. त्याने आपले मित्र समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22) याला हाताशी घेऊन साईनाथला बेदम मारहाण केली.
साईनाथला हॉकी स्टिकने केली मारहाण
करण आणि आदित्य वाल्हेकरने साईनाथला हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत साईनाथ गंभीर जखमी झाला. त्याला तशाच परिस्थितीत सोडून दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. अमानुषपणे मारहाण केल्याने साईनाथचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी सोन्याने पोलिसांना फोनद्वारे संपर्क करत एक व्यक्ती रस्त्यावर पडल्याची माहिती दिली.
हे ही वाचा : नात्याला काळिमा! लेकाचा स्पर्म काऊंट कमी असल्याने पाळणा हालेना, आधी सासऱ्याने सूनेवर नंतर नणंदेच्या नवऱ्याने आळीपाळीने...
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घटनास्थळी साईनाथचा मृतदेह आढळला. सुरुवातीला पोलिसांनी मृतदेह बेवारस असल्याचा संशय व्यक्त केला. पण, शवविच्छेदन केल्यानंतर संबंधित अहवालात हा खून असल्याचं समोर आलं. तपासादरम्यान, पोलिसांना सोन्या आणि त्याच्या मित्रांवर संशय आला असता, चौकशी केल्यानंतर सोन्याने आणि त्याच्या मित्रानेच साईनाथचा खून केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.