लेकीच्या संसारात सासू करायची लुडबुड, अखेर जावयाची सटकली, मटण तोडल्यासारखे केले 19 तुकडे, पोलिसांचीही टरकली

मुंबई तक

Crime News : पती आणि पत्नीच्या संसारात पतीची सासू सतत लुडबुड करायची. जावई आपल्या सासूला वैतागला होता. दोघांच्या संसारात सासूचं लुडबुडणं दिवसेंदिवस वाढू लागलं होतं. याच रागातून पतीने दोन साथीदारांच्या मदतीने आपल्या सासूचा खून केला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीच्या संसारात सासूची लुडबुड

point

जावई सासूला वैतागला

point

नंतर घडलं भयंकर

Crime News : पती आणि पत्नीच्या संसारात पतीची सासू सतत लुडबुड करायची. जावई आपल्या सासूला वैतागला होता. दोघांच्या संसारात सासूचं लुडबुडणं दिवसेंदिवस वाढू लागलं होतं. याच रागातून पतीने दोन साथीदारांच्या मदतीने आपल्या सासूचा खून केला. त्यानंतर तिचे तुकडे तुकडे केले आणि आसपासच्य परिसरात फेकून दिले. ही घटना कर्नाटकातील तमुमकुरु जिल्ह्यातील कोरटगेरे येथील आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जावई हा पेशाने दातांच्या उपचारांचा डॉक्टर असल्याचं तपासातून समोर आले. ही घटना 3 ऑगस्ट रोजी घडली. दरम्यान, आरोपी डॉक्टरचे नाव रामचंद्र असे आहे. तर त्यांच्यासोबत असलेले सतीश आणि किरण यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा : उच्च शिक्षित तरुण पण तरुणीला पाहताच भैसाटला, कसलाही विचार न करता भररस्त्यात पँटची चैन खोलली अन्...

नेमकं काय घडलं? 

तुमरुक पोलीस ठाण्याचे अधीक्षक अशोक केवी यांनी या प्रकरणाचा खुलासा केला असता, हे प्रकरण ऐकून पोलिसही हादरून गेलेत. जावयाने आपल्या सासूचा दोघांच्या मदतीने खून केला आणि नंतर तिचे तुकडे घटनास्थळावरील परिसरात फेकून दिले.

पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास केला आणि गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सासू बेपत्ता झाल्याप्रकरणी शोध सुरु केला. त्यानंतर हे प्रकरण समोर आल्याचं सांगितलं जातंय. तपासादरम्यान, पोलिसांना सासूच्या मृतदेहाचे तुकडे ठिकठिकाणी विखुरलेले दिसू लागले होते. हे सर्व चित्र पाहून पोलिसही भयभीत झाले होते. या प्रकरणात खून करण्यात आलेल्या सासूचे नाव लक्ष्मीदेवी असल्याचं समोर आलं.

तपासातून खळबळजनक सत्य समोर 

पोलिसांनी लक्ष्मीदेवीबाबत विचारले असता, ती शेवटी एका पांढऱ्या कारमध्ये दिसल्याचं सांगितलं. या घटनेचा पोलिसांनी तपास केला असता, तपासातून पोलिसांनी खळबळजनक सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकरणाच्या तपासातून असे समोर आले की, ही कार दुसरी तिसरी कोणाचीही नसून लक्ष्मीदेवीच्या जावयाची आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp