नात्याला काळिमा! लेकाचा स्पर्म काऊंट कमी असल्याने पाळणा हालेना, आधी सासऱ्याने सूनेवर नंतर नणंदेच्या नवऱ्याने आळीपाळीने...

crime news : पतीचा स्पर्म काऊंट कमी असल्याने सासऱ्यानेच सूनेवर अनेकदा बलात्कार केला. सासऱ्यानंतर पीडितेच्या नणंदेच्या नवऱ्यानेही तिचं अनेकदा लैंगिक शोषण केलं. घरातील पाळणा हलावा यासाठी असे हैवानी कृत्य केले जात असल्याचं प्रकरण उघडकीस आले.

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूनेला मुल व्हावं यासाठी सासऱ्याकडून हैवानी कृत्य

point

नणंदेच्या नवऱ्यानेही सोडलं नाही

point

पतचीचा स्पर्म काऊंट होता कमी

Crime news : लग्नानंतर कुटुंबाला जोडप्यांकडून बाळाची अपेक्षा असते. अनेकदा काही महिलांना गर्भधारणा लवकर राहत नाही. तर अनेकदा जोडपेच आपल्या बाळाचं स्वत:हून प्लॅनिंग करतं. जर गर्भधारणा होत नसेल तर डॉक्टरकडे उपचार घेतले जातात. पण गुजरातच्या वडोदरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. लेकाचा म्हणजेच पतीचा स्पर्म काऊंट कमी असल्याने सासऱ्यानेच सूनेवर अनेकदा बलात्कार केला. सासऱ्यानंतर पीडितेच्या नणंदेच्या नवऱ्यानेही तिचं अनेकदा लैंगिक शोषण केलं. घरातील पाळणा हलावा यासाठी असे हैवानी कृत्य केले जात असल्याचं प्रकरण उघडकीस आले.

हे ही वाचा : मोठी बातमी: बच्चू कडूंना 'ते' प्रकरण अखेर भोवलं, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा!

पीडित सूनेकडून पोलीस ठाण्यात तक्रार 

सूनेवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली होती.पण तिचा गर्भपात झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर तिने नवापुरा पोलीस ठाणे गाठलं. त्यानंतर सासा आणि नणंदेच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिने आपल्या नवऱ्याविरोधात ब्लॅकमेलिंगचा आरोप केला. नवरा इंटिमेंट फोटो सर्वत्र व्हायरल करेन अशी धमकी द्यायचा. त्यानंतर मला अनेकदा त्यानं गप्प बसवले, असे तिनं तक्रार दाखलमध्ये नमूद केले.

एफआरयआयनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये तिचं लग्न झालं आणि त्यानंतर तिचा संसार सुरु झाला.काही दिवसानंतर सासू-सासऱ्यांनी नवरा-बायकोला लहान बाळाचं मनावर घेण्यास सांगितलं. वयोमानानुसार गर्भधारणेस त्रासही होईल, त्यातून फर्टीलिटीचे उपचार घ्या, असे ते म्हणाले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता, अहवालातून नवऱ्याचा स्पर्म काऊंटच कमी असल्याची माहिती समोर आली.  यामुळे महिला गर्भवती राहू शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितलं. 

सासऱ्यासह नणंदेच्या नवऱ्याने ठेवले शरीरसंबंध  

त्यानंतर त्यांनी डॉक्टराच्या सल्ल्यानुसार IVF ने गर्भधारणेचा प्रयत्न केला. पण, त्याचा कसलाही फायदा झाला नाही. त्यानंतर तिने उपचारास नकार दिला, तिने मूल दत्तक घेऊ अशी मागणी केली. पण पत्नीच्या मागणीला सासू आणि सासऱ्यांनी विरोध केला. ती 2024 जुलै महिन्यात एका खोलीत झोपली असताना, सासरे तिथे गेले. त्यानंतर त्या सासऱ्याने तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. तिने आरडाओरड केली असता, तिच्या कानशीलात लगावली.

हे ही वाचा : जन्माष्टमीपूर्वी शनिदेवाचा त्रिएकदश योग, काही राशीतील लोकांचा खिसा कधीही राहणार नाही रिकामा, जाणून घ्या राशिभविष्य

डिसेंबर 2024 मध्ये नणंदेच्या नवऱ्याने माझ्यावर बलात्कार केला. जून महिन्यात मी गर्भपती राहिली, पण जुलै महिन्यात माझा गर्भपात करण्यात आला. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ती पोलिसांकडे गेली. पोलिसांन प्राथमिक चौकशी केल्यानंतर रविवारी एफआरआय दाखल करण्यात आली.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp