मेरठसारखंच प्रकरण! घरावर निळ्या ड्रममध्ये नवऱ्याचा आढळला मृतदेह, पत्नी आणि मुलं बेपत्ता, पुरूषांची चांगलीच टरकली

एका महिलेनं अनैतिक संबंधातून आपल्या प्रियकराला हाताशी घेऊन आपल्या पतीची हत्या केली होती. त्यानंतर तो मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर अशीच एक घटना राजस्थानातील खैरथल तिजारा जिल्ह्यातील किशनगड बास शहरात घडली आहे.

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधातून महिलेनं नवऱ्याला संपवलं

point

मेरठसारखीच घटना समोर

point

नेमकं काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेनं अनैतिक संबंधातून आपल्या प्रियकराला हाताशी घेऊन आपल्या पतीची हत्या केली होती. त्यानंतर तो मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर अशीच एक घटना राजस्थानातील खैरथल तिजारा जिल्ह्यातील किशनगड बास शहरात घडली आहे. एका घराच्या छतावर निळ्या ड्रममध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याचं दिसून आले. तो मृतदेह वितळावा यासाठी मीठही टाकण्यात आले होते. परंतु दुर्गंधीमुळे हा पुढील प्रकार समोर आला आहे. 

हे ही वाचा : Pune Crime : पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय, नंतर तीन तलाकची केली मागणी, भरचौकातच ब्लेडने तोंडावर केले सपासप वार

नेमकं काय घडलं? 

दुर्गंधी कुठून येते याचा शोध घेण्यात आला तेव्हा मृतदेह एका छतावरील निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. छतावर जाऊन तपासणी केल्यानंतर ड्रममध्ये मृतदेह आढळून आला होता. घरमालकाने पोलिसांना माहिती दिली की, पोलिसांनी एफएसएल पथकाला बोलावले आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. मृतदेहाची ओळख पटली आहे. 

पोलीस उपअधीक्षक राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, किशनगढच्या आदर्श कॉलनीतील एका घराच्या वरच्या मजल्यावरून दुर्गंधी येत होती. वरच्या मजल्याच्या तपासणीदरम्यान, निळ्या ड्राममधून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी ड्रमची तपासणी केला असता, त्यात मृतदेह आढळून आला. 

पोलिसांनी सांगितला घटनाक्रम 

राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, हा तरुण भाडेतत्वावर राहत असून त्याचे नाव हंसराज उर्फ सूरज असे आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. हा तरुण गेली दीड महिन्यांपासून आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो वीटभट्टीवर काम करायचा. घरमालकील मिथलेश म्हणाली की, रविवारी दुपारी 4 वाजता ती छतावर गेली असता, दुर्गंधी येऊ लागली होती. दुर्गंधी नेमकी कुठून येते हे तपासले असता, निळ्या ड्रममधूनच दुर्गंधी येत असल्याचे आढळून आले. 

मिथलेशने सांगितलं, यानंतर तो खाली आला आणि कुटुंबातील सदस्यांना याची माहिती दिली. यानंतर तपासणीनंतर पोलिसांना कळवण्यात आले की, भाडेकरू हंसराज हा खोलीतच होता. तीन मुलं आणि पत्नी असं त्याचं कुटुंब भाडेतत्वावर राहत होतं. घरमालकाच्या म्हणण्यांनुसार, हंसराज हा कृष्ण जन्माष्टमीदिवशी एका खोलीत होता. शनिवारी घरमालकाची मुले सायंकाळी बाजारात गेली असता, तो तरुण खोलीत होता. 

हे ही वाचा : राज्यभरात पावसाचा हाहाकार, मुंबईत सलग तीन दिवस धो धो सुरूच, लोकल वाहतुकीवर परिणाम

यानंतर, हंसराजची पत्नी आणि तीन मुले आणि जमीनदाराचा मुलगा जितेंद्र हा बेपत्ता असल्याची तक्रार आहे. किशनगढबास पोलीस ठाण्याचे अधिकारी जितेंद्रसिंग शेखावत म्हणाले की, एफएसएल पथकाने घटनास्थळावरून मिळेल ते पुरावे गोळा केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रिपोर्ट आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp