नवरा बायकोमधील वाद उफळला, पतीकडून पत्नीला काठीने मारहाण, नंतर चाकूने हल्ला करत बायकोचे नाक चावले अन्...

crime news : पती-पत्नीचा वाद हा सामान्य असतो. पण सामान्य वादाचे रुपांतर हे टोकाच्या भूमिकेपर्यंत कधी जाईल याचा भरोसा नाही. .याच वादातून नेमकं पुढे काय होईल हेही सांगता येत नाही. अशीच नवरा बायकोच्या नात्यातील घटना उघडकीस आली आहे.

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पती आणि पत्नीच्या नात्यांमध्ये वाद

point

पतीने केला चाकूने हल्ला

point

नंतर पतीने पत्नीचे नाकच चावले

Crime News : पती आणि पत्नीच्या नात्यांमध्ये वाद विवाद ही एक सामान्य बाब असते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मडियांव पोलीस ठाणे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीसोबत भयानक कृत्य केले आहे. पतीचे नाव अरविंद मिश्रा असे आहे. पतची अरविंदने कौटुंबीक वादातून आपल्या पत्नीचेच नाक छाटले आहे. 

हे ही वाचा : मुंबईकरांची दाणादाण, 'या' भागांमध्ये गुडघाभर पाणी, अंधेरीतील सबवे बंद, धडकी भरवणारा पाऊस

पती पत्नीचा वाद शिगेला

ही घटना गायत्री नगर येथील असून अरविंद मिश्रा यांचे 18 ऑगस्ट रोजी कौटुंबिक कलह झाला होता. त्यानंतर तो वाद शिगेला गेल्यानंतर दोघांमध्ये त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. संबंधित प्रकरणात पत्नीने आपल्या पतीने काठीने मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

रागाच्या भरात पत्नीचे चावले नाक

जेव्हा दोघांच्या वादांत सासूने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, मुलाने आपल्या आईला म्हणजेच सासूलाही बेदम मारहाण केली. तो एवढ्यावरच न थांबता त्याने स्वयंपाक घरातून एक चाकू आणला आणि पत्नीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सासूने चाकू हिसकावून घेतला असता, पतीने रागाच्या भरात आपल्याच पत्नीचे नाक चावले. 

हे ही वाचा : संगिताचा शिक्षक मद्यधुंदावस्थेत विद्यार्थिनींना करायचा फोन अन् भेटायला बोलवायचा, नकार दिल्यास द्यायचा धमकी

या झालेल्या प्रकारामुळे घरात मोठी आरडाओरड झाली. कुटुंबातील सदस्यांनी जखमी बबिताला ताबडतोबत रुग्णालयात दाखल केले आणि तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती माध्यमांनी दिली. संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्याचे प्रभारींनी सांगितलं की, पीडितेच्या सासरच्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणात पतीला अटक करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp