संगिताचा शिक्षक मद्यधुंदावस्थेत विद्यार्थिनींना करायचा फोन अन् भेटायला बोलवायचा, नकार दिल्यास द्यायचा धमकी
Crime News : तीन विद्यार्थिनींना एका संगीत शिक्षकाने रात्री फोनद्वारे संपर्क करत भेटायला बोलावले. जर भेटायला आला नाही,तर तुम्हाला परीक्षेत नापास करेन अशी धमकीही दिली.

बातम्या हायलाइट

शिक्षकाने तीन विद्यार्थिनींचा केला छळ

विद्यार्थिनींचा शिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप

नेमकं काय घडलं?
Crime News : गुरूग्राममध्ये एका गावातील सरकारी शाळेतील एका शिक्षकाने तीन विद्यार्थिनींचा छळ केल्याचा आरोप आहे. या तीन विद्यार्थिनींनी संगीत विषय शिकवणाऱ्या शिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणाची सोमवारी माहिती दिली आहे. या घटनेनं गुरु आणि शिष्याचा नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
हे ही वाचा : मुंबईकरांची दाणादाण, 'या' भागांमध्ये गुडघाभर पाणी, अंधेरीतील सबवे बंद, धडकी भरवणारा पाऊस
नेमकं प्रकरण काय?
संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, गुरूग्राम ब्लॉकमधील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थिनींनी शिक्षकावर छळाचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर मेसेज केल्याचा आणि रात्री उशिरा फोनद्वारे संपर्क केल्याचा आरोप करण्यात आला. विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलं. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापकांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत निर्णय घेतला.
...तर परीक्षेत नापासच करेन
इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलींनी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेव्हा पीडित विद्यार्थ्यांनी आरोप केला की, संगीताचे शिक्षक त्यांना रात्री उशिरा फोन करून भेटायला येण्यास सांगायचे. विद्यार्थ्यांनी आरोप केला की, शिक्षक त्यांना धमकावत असे आणि म्हणत असे की, जर त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न केल्यास परीक्षेत नापासच करून टाकेन अशी धमकी दिली.
हे ही वाचा : गजकेसरी राज योग होणार निर्माण, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने पैशांचा पडणार पाऊस, काय सांगतं राशीभविष्य
तक्रारीनंतर बीईओ सुदेश राघव यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन करून शाळेच्या अंतर्गत समितीकडून अहवाल मागितला असता, विद्यार्थ्यिनींच्या पालकांनी आरोप केला की, शिक्षक मद्यधुंद अवस्थेत असताना विद्यार्थिनींना बोलावले होते. संबंधित प्रकरणात शाळा व्यवस्थापन लवकरच चौकशी करतील. सविस्तर माहिती जाणून घेत आहेत. बीईओ यांनी या घटनेला संवेदनशील म्हणत चौकशीला सुरुवात केली आहे.