रेस्टॉरंटच्या Washroom मध्ये हिडन कॅमेरा ठेवला अन् महिलेची रेकॉर्डिंग केली, आरोपीला पकडलं अन् सर्व व्हिडीओ..

Today Shocking Video Viral :  कोणत्याही रेस्टॉरंटच्या वॉशरुममध्ये जाण्याआधी सावध राहणे खूप महत्त्वाचे असते. गुजरातच्या सूरतमध्ये एका रेस्टॉरंटच्या महिला वॉशरूममध्ये मोबाईलचा हिडन कॅमेरा ठेवल्याचं उघडकीस आलं

न्यू जर्सीमध्ये बाथरूममध्ये लपलेला कॅमेरा लावताना पकडले गेले
Bathroom Video Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मागील दोन वर्षांपासून रेस्टॉरंटमध्ये काम करायचा आरोपी

point

एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडीओ ट्रान्सफर करायचा

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Today Shocking Video Viral :  कोणत्याही रेस्टॉरंटच्या वॉशरुममध्ये जाण्याआधी सावध राहणे खूप महत्त्वाचे असते. गुजरातच्या सूरतमध्ये एका रेस्टॉरंटच्या महिला वॉशरूममध्ये मोबाईलचा हिडन कॅमेरा ठेवल्याचं उघडकीस आलं. रेस्टॉरंटच्या वॉशरूमला लावलेल्या व्हेंटिलेशन ग्रिलच्या मागे मोबाईल फोन ठेवण्यात आला होता. एका महिलेनं हा फोन पाहिला, त्यानंतर मोठी खळबळ उडाली. 

महिलेनं याबाबतची माहिती रेस्टॉरंटच्या मॅनेजरला दिली. महिलेसह अन्य लोकांनीही अशाप्रकारच्या कृत्याचा विरोध केला. काही लोकांनी असाही आरोप केला की, पुरुष साफसफाई करणाऱ्या महिलांच्या शौचालयमध्ये जात होते. त्यानंतर प्रकरण गंभीर झालं आणि याबाबत उमरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सुरेंद्र राणाला अटक करण्यात आली आहे. 

मागील दोन वर्षांपासून रेस्टॉरंटमध्ये काम करायचा आरोपी

सुरेंद्र राणा मागील दोन वर्षांपासून रेस्टॉरंटमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. महिलांच्या वॉशरूमच्या सफाईचं काम त्यालाच देण्यात आलं होतं. सुरेंद्रला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 5 मोबाईल जप्त केले. रेस्टॉरंटच्या वॉशरुममध्ये वेंटिलेशनसाठी जालीनुमा स्क्रीन लावण्यात आली होती. या स्क्रीनचा एक भाग तुटला होता. आरोपीने यातच मोबाईल फोन ठेवला होता.

हे ही वाचा >> मुंबईकरांनो सावधान, उद्याही कोसळणार प्रचंड पाऊस.. Red अलर्ट जारी, 'यामुळे' मुंबईत बरसतोय अतिमुसळधार पाऊस

पोलीस तपासात आरोपी सुरेंद्रने म्हटलं की, शौचालय साफ करण्याचा व्हिडीओ बनवत होतो. तपासादरम्यान त्याच्या मोबाईल फोनमध्ये पॉर्न हिस्ट्री आणि स्पाय कॅम बॉक्सही सापडला. महिलांची व्हिडीओ रेकॉर्डिंग चुकीच्या इंटेन्शनमुळे केली गेली, असा संशय व्यक्त करण्यात आला. सुरेंद्र झारखंडचा असून त्याच्याकडे आधीपासूनच एक सिम नसलेला मोबाईल होता. 

एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडीओ ट्रान्सफर करायचा

आरोपी सुरेंद्र एका मोबाईल फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये व्हिडीओ ट्रान्सफर करायचा. दरम्यान, पोलिसांनी सुरेंद्र आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी केली. रेस्टॉरंटमध्ये एकूण 50 लोक काम करतात. यामध्ये 40 पुरुष आहेत. पोलीस आता सर्व कर्मचाऱ्यांचे फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार आहेत.

हे ही वाचा >> पती आंघोळ करत होता..पत्नीनं दरवाजा बंद केला अन् केलं सर्वात भयंकर कृत्य, आख्ख्या गावभर झाली चर्चा!

हे वाचलं का?

    follow whatsapp