पती आंघोळ करत होता..पत्नीनं दरवाजा बंद केला अन् केलं सर्वात भयंकर कृत्य, आख्ख्या गावभर झाली चर्चा!
Husband And Wife Shocking News : लुधियानाच्या एका नवविवाहित पुरुषासोबत पत्नीने भयंकर कृत्य केलं. पत्नीने पतीला बाथरूममध्ये बंद करून दागिने आणि किंमती वस्तू चोरी केल्या.

बातम्या हायलाइट

महिला मोबाईलचा अतिवापर करायची अन्..

पती आंघोळ करत होता..पत्नीनं दरवाजा बंद केला अन्..

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?
Husband And Wife Shocking News : लुधियानाच्या एका नवविवाहित पुरुषासोबत पत्नीने भयंकर कृत्य केलं. पत्नीने पतीला बाथरूममध्ये बंद करून दागिने आणि किंमती वस्तू चोरी केल्या. दोघांचं लग्न होऊन महिनाही झाला नव्हता, तोच महिलेनं हे कांड केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील छेहरटा येथील रहिवासी आहे. अमनदीप कौर असं त्या महिलेचं नाव आहे. 11 जून रोजी सासरच्या घरून गायब होण्यापूर्वी तिने सोनं, दागिने आणि आयफोन चोरला, असा आरोप आहे.
महिला मोबाईलचा अतिवापर करायची अन्..
रिपोर्टनुसार, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुखराज सिंहने तक्रार दाखल करत पोलिसांना सांगितलं की, त्याने 25 मे रोजी अमनदीप कौरसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर त्याने पाहिलं की, पत्नी मोबाईलवर खूप व्यस्त असते.
हे ही वाचा >> मुंबईकरांनो सावधान, उद्याही कोसळणार प्रचंड पाऊस.. Red अलर्ट जारी, 'यामुळे' मुंबईत बरसतोय अतिमुसळधार पाऊस
पती आंघोळ करत होता..पत्नीनं दरवाजा बंद केला अन्..
ती कुटुंबियांशी सारखं फोनवर बोलायची. सर्वकाही ठीक होईल असं वाटत होतं. पण 11 जून रोजी जेव्हा पती आंघोळ करत होता. तेव्हा तिने बाथरूमचा दरवाजा बंद केला आणि घरातील दागिने लंपास केले. मिळालेल्या माहितीनुसार, अमनदीप कौर छेहरटा येथील निखिल नावाच्या व्यकीसोबत राहत होती.
पत्नीने घर सोडण्याआधी दागिने आणि किंमती वस्तू चोरी केल्याचा आरोप पतीने केला. दरम्यान, तपास अधिकारी एएसआई साहिब सिंह यांनी म्हटलं की, बीएनएसच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल.