राज्यभरात पावसाचा हाहाकार, मुंबईत सलग तीन दिवस धो धो सुरूच, लोकल वाहतुकीवर परिणाम
मुंबईमध्ये गेली तीन दिवस पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे मुंबईतील काही उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर याचा परिणाम हा मुंबई लोकलवर होताना दिसतो.

बातम्या हायलाइट

राज्यभरात पावसाचा हाहाकार

मुंबईत सलग तीन दिवस नुसता धो धो

रेल्वे वाहतूकीवर परिणाम
Mumbai rain : राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यात प्रामुख्याने कोकणभागात मोठ्या प्रमाणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये गेली तीन दिवस पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे मुंबईतील काही उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर याचा परिणाम हा मुंबई लोकलवर होताना दिसतो.
हे ही वाचा : Maharashtra Weather: कोकणात पावसाचा हाहाकार, रत्नागिरी- सिंधुदुर्गात वरूणराजाचं रौद्ररुप अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट
चाकरमान्यांचा खोळंबा
सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना या पावसाचा सामना करावा लागतो. या पावसामुळे लोकल सेवेवरतीही अनेकदा परिणाम होऊ शकतो. या पावसामुळे हार्बर लाईन लोकलच्या सेवेवर परिणाम होताना दिसतो. हार्बर लोकल उशिराने येत असल्याने प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत.
दरम्यान, मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव, मलाड, कांदिवली, बोरिवली,दहिसर,विलेपार्ले, सांताक्रुझ,वांद्रे परिसरात सध्या मुसळधार ावस सुरू आहे. या भागांध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरू लागले आहे. दरमयान, आता हवामान विभागाने मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचं सांगितलं.
पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम
या मुसळधार पावसाने रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. सध्या लोकची वाहतूक पाच ते दहा मिनिटांनी उशीरा होते.तर पश्चिम रेल्वेचा प्रवासहा व्यवस्थित सुरळीत आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर रेल्वे वाहतूकीर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : कर्क राशीत शुक्र आणि बुध ग्रहाचे आगमन, लक्ष्मी नारायण राजयोगामुळे काही राशीतील लोक होणारा मालामाल
मुंबईतील कोणत्या भागाती किती पाऊस?
टाटा पॉवर चेंबूर 81.5 मिमी
सांताक्रूझ 70 मिमी
विक्रोळी 69 मिमी
सायन 67 मिमी
जुहू 58 मिमी
भायखळा 58 मिमी
बांद्रा 54 मिमी
कुलाबा 22 मिमी