पत्नीनं नवीन मोबाईल घेतला..पतीचा संशय बळावला! चाकूने तिचा गळा कापला, मुलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला अन्..
Shocking Murder Case : नवी दिल्लीच्या सीलमपूर परिसरात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली.

बातम्या हायलाइट

पतीने संशयावरून पत्नीचा गळा कापला

काय आहे हत्येमागचं कारण?

पोलिसांनी आरोपीला केली अटक
Shocking Murder Case : नवी दिल्लीच्या सीलमपूर परिसरात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपी स्वत: दोन लहान मुलांना सोबत घेऊन सीलमपूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांना त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली आणि हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, इंतजार अली (26) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो सीलमपूरच्या के के ब्लॉकमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होता. इंतराजचं लग्न सहा वर्षांपूर्वी चांदणीसोबत झालं होतं. त्यांना अबुजर आणि आयत नावाची दोन मुलं आहेत.
पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचं. शनिवारी उशिरा रात्री जवळपास 3 वाजता इंतजार मुलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांना म्हणाला की, त्याने त्याच्या पत्नीची हत्या केलीय. पोलीस तातडीनं त्याच्या घरी पोहोचले आणि चांदणीचा मृतदेह पाहून हादरले.
हे ही वाचा >> मोठी बातमी.. मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये शाळा, कॉलेजला सुटी जाहीर.. पावसाचा कहर सुरूच!
काय आहे हत्येमागचं कारण?
पोलीस तपासात समोर आलं की, इंतजार त्याची पत्नी चांदणीवर संशय घ्यायचा. जवळपास दहा दिवसांपूर्वी चांदणीने एक नवीन मोबाईल खरेदी केला होता. इंतजारला वाटत होतं की, ती दुसऱ्या कोणाशी बोलत आहे. या संशयामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. याच कारणामुळे इंतजारने पत्नीची हत्या केल्याचं समोर आलं.
दरम्यान, पोलिसांनी इंतजारला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे, जेणेकरून या हत्येमागची कारणे उघड होतील. सीलमपूर पोलीस याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहे. कोणत्या अन्य कारणामुळे महिलेची हत्या झाली का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.