आई आणि मुलगा चालवायचे सेक्स रॅकेट, नागपूरमधील भाड्याच्या घरात अवैध व्यवसाय! पैशाचं आमिष दाखवून मुलींना...
सध्या नागपूर पोलीस ऑपरेशन शक्ती चालवत असल्याचं पाहायला मिळतंय. याच कारवाईअंतर्गत, पोलिसांनी नागपूरच्या हुडकेश्वर भागात छापा टाकून एका आई आणि मुलाला अटक केली.

बातम्या हायलाइट

नागपुरमध्ये वैश्याव्यवसाय चालवणाऱ्या आई आणि मुलाला अटक

पैशाचं आमिष दाखवून मुलींना अडकवलं अन्...
Nagpur Crime: सध्या नागपूर पोलीस ऑपरेशन शक्ती चालवत असल्याचं पाहायला मिळतंय. या ऑपरेशन अंतर्गत पोलीस शहरात कार्यरत असलेल्या वेश्याव्यवसाय केंद्रांवर सतत छापे टाकत असल्याचं देखील समोर येत आहे. याच कारवाईअंतर्गत, पोलिसांनी नागपूरच्या हुडकेश्वर भागात छापा टाकून एका आई आणि मुलाला अटक केली. यादरम्यान, जबरदस्तीने रॅकेटमध्ये सहभागी करण्यात आलेल्या मुलींची सुटका करण्यात आली.
भाड्याच्या घरात सेक्स रॅकेट...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सुनीता विकास कांबळे आणि तिचा मुलगा यश विकास कांबळे यांनी आरटीओ विभागामध्ये खाजगी काम करण्याच्या नावाखाली गेल्या सहा महिन्यांपासून एक घर भाड्यानं घेतलं होते आणि याच ठिकाणाहून ते वेश्याव्यवसाय चालवत होते. त्यानंतर हुडकेश्वर लेआउटमधील एका घरात सेक्स रॅकेट चालवलं जात असून पैशाच्या आमिषाने तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याची नागपूर पोलिसांच्या क्राइम ब्रांचला माहिती मिळाली.
हे ही वाचा: कुत्र्याने 2 वर्षांच्या मुलाला चाटलं! कुत्र्याच्या लाळमध्ये होतं खतरनाक Virus, डॉक्टरांनी सांगूनही ऐकलं नाही, मुलाचा दुर्देवी मृत्यू!
बनावट ग्राहक पाठवून पोलिसांचा छापा
या माहितीच्या आधारे, पोलिसांनी या घरात एक बनावट ग्राहक पाठवला आणि एका तरुणीसाठी ऑनलाइन डील करण्यात आली. त्यावेळी 1,000 रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आल्याची माहिती आहे. ही डील झाल्यानंतर लगेच पोलिसांनी घरावर छापा टाकला आणि आई आणि मुलाला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
हे ही वाचा: मांत्रिकाला घरी घेऊन गेली अन् काळ्या जादूच्या नावाखाली... विधी झाल्यानंतर मांत्रिकाने ‘अशी’ गोष्ट लंपास केली की...
27 वर्षीय तरुणीची सुद्धा सुटका
पोलिसांनी केलेल्या या कारवाईदरम्यान, छत्तीसगडमधील एका 27 वर्षीय मुलीची देखील सुटका करण्यात आली. संबंधित तरुणीला पैशाचं आमिष दाखवून नागपूरला आणण्यात आलं होतं. आरोपी फक्त प्रीमियम ग्राहकांना मुली पुरवण्याचं काम करायला आणि व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून डील पक्क करण्यात येत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं.