कुत्र्याने 2 वर्षांच्या मुलाला चाटलं! कुत्र्याच्या लाळमध्ये होतं खतरनाक Virus, डॉक्टरांनी सांगूनही ऐकलं नाही, मुलाचा दुर्देवी मृत्यू!
Rabies Death From Dog Saliva: दिल्ली NCR मध्ये असलेल्या सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून हटवून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. कोर्टाच्या या निर्णयाचा लोकांनी विरोध केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कुत्र्याची लाळ धोकादायक का असते?

रेबीज काय आहे?

कुत्र्याच्या लाळमध्ये हे जंतू असतात
Rabies Death From Dog Saliva: दिल्ली NCR मध्ये असलेल्या सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून हटवून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. कोर्टाच्या या निर्णयाचा लोकांनी विरोध केला आहे. अशातच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजचा आजार होऊन लोकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण कुत्र्याच्या चाटण्यामुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच हादरा बसला आहे. ही धक्कादायक घटना बदायूंच्या सहसवान परिसरात घडली. अदनान असं मृत्यू झालेल्या दोन वर्षांच्या मुलाचं नाव आहे. कुत्रा मुलाला चावलाही नव्हता, फक्त त्याच्या जुन्या जखमेवर त्याने चाटलं होतं. पण याच बेजबाबदारपणामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी दिली होती सूचना
या घटनेबाबत बदायूं जिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रशांत त्यागी यांनी म्हटलं होतं की, कुत्र्यांचं चावणं किंवा चाटणं हलक्यात घेऊ नका. कारण यामुळे रेबीज होण्याचा धोका असतो. फक्त कुत्राच नाही, तर मांजर आणि माकड चावल्याने किंवा चाटल्याने रेबीज होऊ शकतो. यासाठी तातडीनं रुग्णालयात जाऊन अँटीरेबीजचं इजेक्शन घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या घटनेला गांभीर्यानं घेतलं पाहिजे.
हे ही वाचा >> ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं
रेबीज काय आहे?
रेबीज एक असा आजार आहे, ज्यामुळे दिमाग आणि नर्व सिस्टमवर परिणाम होतो. हा आजार व्हायरसमुळे होतो. याचं नाव रेप्टो व्हायरस आहे. प्राण्यांच्या चाव्यामुळे किंवा चाटल्याने माणसांना हा आजार होतो. हा आजार जीवघेणाही होऊ शकतो.
कुत्र्याची लाळ धोकादायक का असते?
कुत्र्याच्या लाळमध्ये रेबीज व्हायरस असू शकतो. जे जखम किंवा म्यूकस मेम्ब्रेन (डोळे, तोंड, नाक) यांच्या संपर्कात आल्याने माणसांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग जखमेला चावल्याने किंवा चाटल्याने होतो. रेबीज एक व्हायरस असतो. पण कुत्र्याच्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया (जंतू) असतात. हे जंतू जर जखम किंवा त्वचेचा कापलेल्या भागाच्या संपर्कात आले, तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.