जावई आणि दाजीसोबतच सासूचे अनैतिक संबंध! पतीला कळालं म्हणून शेतात नेलं अन्...
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज शहरात एका विवाहित महिलेचे तिच्या दाजी आणि जावयाशी अनैतिक संबंध होते. मात्र, पतीला हे कळताच पत्नीने असं काही केलं, जे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

बातम्या हायलाइट

जावई आणि मेहुण्यासोबतंच महिलेचे अनैतिक संबंध...

पतीला कळताच महिलेनं केला धक्कादायक प्रकार...
Crime News: बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज पोलीस स्टेशन परिसरात एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका विवाहित महिलेचे तिच्या दाजी आणि जावयाशी अनैतिक संबंध होते. मात्र, पतीला हे कळताच पत्नीने असं काही केलं, जे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घ्या.
एके दिवशी, उर्मिला देवी नावाची एक महिला मुरलीगंज पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. तिने सांगितले की, तिचा मुलगा जसवंत यादव आणि सून पुनिता देवी यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून कोर्टात केस सुरू होती. या काळात पुनीताचा जावई अमित कुमार आणि मेव्हणा राजेश यादव यांच्याशी पुनीताचे अनैतिक संबंध निर्माण झाले. जसवंत म्हणजेच तिच्या नवऱ्याने या नात्याला विरोध केला. आपल्या वैतागल्याने पुनीताने तिच्या प्रियकरांसह तिच्या पतीची हत्या केली.
अल्पवयीन मुलीचं प्रियकरासोबत लग्न...
इतकेच नव्हे तर पुनीताने तिच्या 12 ते13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं लग्न तिच्या प्रियकर अमितशी लावलं असल्याचे गंभीर आरोप पुनीताच्या सासूने केले. तसेच पुनीता त्यांची एक बिघा जमीन अमितच्या नावावर रजिस्टर करावी, यासाठी सतत दबाव आणत होती. यासाठी जसवंतने जमीन देण्यास स्पष्ट नकार दिल्याने पुनीताने तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला.
हे ही वाचा: बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल, साधा भोपळाही फोडला नाही, महापालिका निवडणुकीत विजय अवघड
17 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास पुनीताने तिचा जावई अमित, दाजी राजेश यादव आणि इतर काही मित्रांसह जसवंतला शेतातील खत आणण्याच्या बहाण्याने बोलावलं. त्यांनी जसवंतला शेतात नेलं आणि धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. जसवंतच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला.
रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह
दुसऱ्या दिवशी सकाळीच जसवंतचा रक्ताने माखलेला मृतदेह शेतात आढळला. अगदी निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच, चुलत भाऊ रामानंद यादव यांनीही पुनीतावर आरोप करत सांगितलं की पुनीता अमितसोबत बऱ्याच काळापासून प्रेमसंबंधात होती. हे लपवण्यासाठी तिने तिच्या अल्पवयीन मुलीचं अमितशी लग्न लावून दिलं. इतकेच नव्हे तर ती तिच्या पतीला सोडून अमित आणि तिच्या मुलीसोबत भाड्याच्या घरात राहत होती.
हे ही वाचा: "त्यांनाच त्यांची किंमत कळली..." बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा सुफडासाफ, नाव न घेता भाजप नेत्यानं डिवचलं
मुरलीगंज पोलिस स्टेशनचे अधिकारी अजित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या आईच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित तरुणाची पत्नी पुनीता, तिचा मेहुणा राजेश यादव तसेच, आणखी एका साथीदाराला अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.