Govt Job: ‘इंडियन आर्मी’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू, पात्रतेसह जाणून घ्या सविस्तर माहिती...

‘इंडियन आर्मी’ने आर्मी डेंटल कॉर्प्स शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरती 2025 साठी अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

‘इंडियन आर्मी’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू...
‘इंडियन आर्मी’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'इंडियन आर्मी'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

point

भारतीय सैन्याकडून 'या' पदांसाठी निघाली भरती

Govt Job:  भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तसेच वैद्यकीय म्हणजेच मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘इंडियन आर्मी’ने आर्मी डेंटल कॉर्प्स शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरती 2025 साठी अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार join.afms.gov.in या इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पात्रता 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवाराने ‘डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया’ (DCI) द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही महाविद्यालय/विद्यापीठातून BDS/MDS उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. यासोबतच, उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 45 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. उमेदवारांच्या वयाची गणना 31 डिसेंबर 2025 तारखेनुसार केली जाईल.

उमेदवारांसाठी उंचीची मर्यादा  

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पुरुष उमेदवाराची किमान उंची 157 सेमी आणि महिला उमेदवाराची किमान उंची 152 सेमी असणं गरजेचं आहे. डोंगराळ आणि ईशान्य राज्यांमधून येणाऱ्या उमेदवारांसाठी किमान उंची 152 सेमी आणि तसेच, महिलांसाठी 157 सेमी किमान उंची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

हे ही वाचा: आई आणि मुलगा चालवायचे सेक्स रॅकेट, नागपूरमधील भाड्याच्या घरात अवैध व्यवसाय! पैशाचं आमिष दाखवून मुलींना...

अर्जाचे शुल्क किती?   

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी join.afms.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवारांना अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्यासोबतच, सर्व श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये शुल्क अनिवार्यपणे भरावं लागेल. शुल्काशिवाय भरलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवार अर्जाचे शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरू शकतात.

हे ही वाचा: कुत्र्याने 2 वर्षांच्या मुलाला चाटलं! कुत्र्याच्या लाळमध्ये होतं खतरनाक Virus, डॉक्टरांनी सांगूनही ऐकलं नाही, मुलाचा दुर्देवी मृत्यू!

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं स्क्रीनिंग करून त्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलं जाईल. मुलाखतीत यशस्वी झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहावं लागेल. त्यानंतर, नियुक्त झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाईल. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांच्या सर्व मूळ डॉक्यमेंट्सचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. या भरतीद्वारे एकूण 30 पदे भरली जातील.

हे वाचलं का?

    follow whatsapp