BEST Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईतल्या निवडणुकीत कशामुळे झाला एवढा दारूण पराभव?
Thackeray Brothers: मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा अत्यंत दारूण असा पराभव झाला. जाणून घ्या हा पराभव नेमका कसा झाला.
ADVERTISEMENT

अतिक शेख, मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांना पहिलाच मोठा राजकीय धक्का यावेळी बसला आहे. कारण युती म्हणून निवडणूक लढविणाऱ्या या दोन पक्षांना पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे भावांनी उत्कर्ष नावाचं पॅनल रिंगणात उतरवलं होतं. या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने सगळ्या 21 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. पण त्यापैकी एकाही जागेवर ठाकरेंच्या उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.
शशांक राव यांच्या पॅनलला 14 आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलला 7 जागा मिळाल्यात. त्यामुळं ठाकरे बंधूंच्या पॅनलचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. पण ठाकरे भावांच्या पॅनलचा पराभव कसा आणि का झाला हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.
हे ही वाचा>> बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल.. साधा भोपळाही फोडला नाही, महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका
दरम्यान, या पराभवावर बेस्टच्या कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी प्रतिक्रिया देताना पाहा नेमकं काय म्हटलंय.
बेस्ट पतपेढीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये आमचा पराभव झाला पण जे जिंकले त्यांचं अभिनंदन. आता तुम्ही म्हणाल की हे कसं झालं? बारा हजार कर्मचारी माझ्यासोबत असताना आमचा पराभव झाला. प्रचंड पैशाचा ओघ मागील आठवड्याभरापासून पाहायला मिळाला. आम्हाला वाटलं की, कर्मचारी पैसे घेतील मात्र मतदान आम्हाला करतील. पैशाच्या समोर आम्ही कमी पडलो. बेस्ट वाचण्यासाठी मी प्रयत्न केले. भाजपने पैसा लावला आपल्या अधिकाराचा वापर केला. आम्ही कॉन्टॅक्ट करण्यामध्ये आणि पैसा लावण्यामध्ये कमी पडलो. मला आश्चर्य वाटतं की भाजप सारखा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीला एवढी सगळी यंत्रणा लावतो. जे त्यांना हवे त्यासाठी हे सगळं करतात यासाठी कौतुक त्यांचं करावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की ही भीती सुद्धा आहे.










