काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या हॉटेलमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय..मॅनेजरसह 8 जणांना अटक, 3 महिलांचाही समावेश, घडलं असं काही..

Police Busted Prostitution Racket :  कानपूरमध्ये काँग्रेस नेत्याच्या हॉटेलमध्ये देहव्यापार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रेलबाजार येथील एका हॉटेल राजेंद्रा पॅलेसमध्ये शनिवारी रात्री पोलिसांनी धाड टाकली.

सलूनच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. (छायाचित्र: प्रातिनिधिक)
Police Busted Prostitution Racket
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या हॉटेलमध्ये घडलं तरी काय?

point

पोलिसांनी 8 आरोपींना केली अटक

point

3 महिलांनाही ठोकल्या बेड्या

Police Busted Prostitution Racket :  कानपूरमध्ये काँग्रेस नेत्याच्या हॉटेलमध्ये देहव्यापार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रेलबाजार येथील एका हॉटेल राजेंद्रा पॅलेसमध्ये शनिवारी रात्री पोलिसांनी धाड टाकली. यावेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या हॉटेल मॅनेजरसह आठ लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये तीन विवाहित महिलांचाही समावेश आहे. सर्व आरोपींची मेडिकल टेस्ट करून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. फरार झालेल्या हॉटेलच्या दोन संचालकांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये बहुतांश पुरष आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या हॉटेलमध्ये धाड टाकण्यात आली होती, तो हॉटेल काँग्रेस नेता राजेश सिंह यांचा आहे. त्यांनी हा हॉटेल लीजवर दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कैंट येथील एसपी आकांक्षा पांडे यांचं म्हणणं आहे की, हॉटेलला सीज केलं जाईल. शनिवारी उशिरा रात्री सेंट्रल स्टेशनच्या गेट नंबर तीनजवळ काँग्रेस नेता राजेश सिंह यांच्या हॉटेल राजेंद्र पॅलेसमध्ये देहव्यापार सुरु असल्याची खबर मिळाली होती.

हे ही वाचा >> Amit Shah Interview : माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?

त्यानंतर पोलिसांनी स्वत: ग्राहक बनून या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकली होती. जिथे रुममध्ये अनेक ग्राहक आणि महिला नको त्या अवस्थेत असल्याचं पोलिसांनी पाहिलं. तपासात समोर आलं की, हे हॉटेल अशोक पटेल आणि पुनीत कुमार यांनी लीजवर चालवत होते.

पोलिसांनी घटनास्थळावरून मॅनेजर लोकेश बाजपेईसह पंजाबच्या कपूरथाला शेखूपूर गावातील रहिवासी गुरुदेव, पंजाबचा पटियाला बलवेडा येथील रहिवासी सुखविंदर सिंह, हरबंश मोहाल रहिवासी मनीष राठौर, रेलबाजार येथे राहणारा शैलेंद्र पांडेसह तीन महिलांना अटक केली आहे. 

पोलीस अधीक्षकांनी म्हटलं की, आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. हॉटेल लीजवर घेण्याऱ्या दोन्ही तरुणांचा तपास सुरु आहे. दरम्यान, हॉटेलचा मालक राजेश सिंह यांची चौकशी करण्यात आली नाहीय. हॉटेलला सीज करण्यात येईल. या हॉटेलचे कागदपत्रही पाहण्यात येतील.

हे ही वाचा >>मुंबईत हळहळ! जवळच्या नातेवाईकानेच काढला काटा, आधी अपहरण अन् नंतर हत्या, एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह

हे वाचलं का?

    follow whatsapp