मुंबईत हळहळ! जवळच्या नातेवाईकानेच काढला काटा, आधी अपहरण अन् नंतर हत्या, एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह

mumbai crime : मुंबईतील कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचच्या शौचालयात एका लहान मुलाचा मृतदेह सापडल्याचं प्रकरण आता उघडकीस आलं आहे. या घटनेची माहिती प्रवाशांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

mumbai crime
mumbai crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह

point

प्रवाशांच्या पायाखालची जमीन सरकली

point

नेमकं टिळक टर्मिनसवर काय घडलं?

Mumbai Crime : मुंबईतील कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचच्या शौचालयात एका लहान मुलाचा मृतदेह सापडल्याचं प्रकरण आता उघडकीस आलं आहे. या घटनेची माहिती प्रवाशांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधितांनी ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली आणि त्यानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हे ही वाचा : Amit Shah Interview : माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

नेमकं प्रकरण काय? 

ही घटना एलटीटी कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एसी कोचमध्ये B 2 टॉयलेटमधील आहे. त्याच ठिकाणी लहान मुलाचा मृतदेह कचऱ्याच्या डब्ब्यात टाकण्यात आला होता. हे पाहून सर्वजण हैराण झाले. या घटनेची माहिती प्रवाशांना कळताच प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली. संबंधित प्रकरणाची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आलं.

1 वाजता कुशीनगर एक्सप्रेस ही लोकमान्य टिळक टर्मिनसवर उभी होती. संबंधित प्रकरणाची माहिती ही दुपारी 2.45 वाजता रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, रेल्वे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि घटनास्थळी जाऊन तपास केला. रेल्वेत बसलेल्या प्रवाशांना संबंधित प्रकरणाची माहिती समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर लहान मुलाचं अपहरण केल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : "पोलिसांचा वापर करत फडणवीस मराठ्यांना त्रास देतात, एवढंच वाटतं तर महादेव मुंडे.." जरांगेंची तोफ धडाडली, मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही

नातेवाईकाकडून मुलाचं अपहण 

मुलाचं अपहरण त्याच्याच नातेवाईकानं केलं आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासातून लहान मुलाचं अपहरण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अपहरण आणि हत्या याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp