गणेश चतुर्थी 2025: यंदा तुमच्याही घरी गणपती बाप्पाचं होणार आगमन? मग 'या' गोष्टी अजिबात विसरू नका
यावर्षी 27 ऑगस्ट रोजी अपार उत्साहाने आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या घरात पहिल्यांदाच गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करत असाल, तर याबद्दल काही योग्य आणि महत्त्वाच्या पद्धती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

बातम्या हायलाइट

गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी 'या' टिप्स लक्षात ठेवा...

पहिल्यांदाच बाप्पाचं आगमन करताना 'या' गोष्टी अजिबात विसरू नका
Ganesh Chaturthi 2025: हिंदू धर्मात भाद्रपद महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात बरेच महत्त्वाचे व्रत आणि सण साजरे केले जातात. त्यापैकी गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यावर्षी 27 ऑगस्ट रोजी अपार उत्साहाने आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यादिवशी कित्येक लोकांच्या घरात गणरायाची स्थापना केली जाते आणि त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. 10 दिवसांचा हा उत्सव गणेश भक्त मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
जर तुम्ही तुमच्या घरात पहिल्यांदाच गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करत असाल, तर याबद्दल काही योग्य आणि महत्त्वाच्या पद्धती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अयोध्या येथील ज्योतिषी पंडीत कल्की राम यांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.
गणरायाच्या मूर्तीची निवड:
घरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी गणपतीची मूर्ती निवडताना काही बाबींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. विशेषत: बाप्पाची सोंड डाव्या बाजूला झुकलेली असावी. अशा प्रकारची मूर्ती घरात आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. याव्यतिरिक्त, बैठी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करणं हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं.
हे ही वाचा: Govt Job: आता मुंबई हायकोर्टात मिळवा नोकरी... 'या' पदांसाठी निघाली भरती! कधीपर्यंत कराल अर्ज?
मूर्तीच्या स्थापनेची दिशा:
तसेच गणरायाच्या मूर्तीची ईशान्य दिशेला प्राणप्रतिष्ठापणा करणं आणि मूर्तीचं तोंड उत्तरेकडे असणं, शुभ मानलं जातं. श्री गणेशाचं पूजन करण्यासाठी एका चौरंगावर बशिक (लाल रंगाचा कपडा) पसरवा. त्यावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करा.
पूजेच्या विधी:
गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केल्यानंतर, त्याठिकाणी शुद्ध गंगाजल शिंपडा आणि मूर्तीवर थोडे तांदूळ अर्पण करा. मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवा. त्यानंतर फुले आणि तांदूळ घेऊन गणरायाची पूजा करा.
हे ही वाचा: सरकारचं लक्ष आहे का? चिमुकले 4-4 तास अडकले बसमध्ये, ट्रॅफिकमुळे 'हे' अवघं शहर गुदमरलं!
नैवेद्य आणि पूजा:
पूजा करताना गणपतीला फळे आणि फुले अर्पण करा. त्यासोबतच नैवेद्य दाखवून पूजा करा. मोदक बाप्पाच्या अत्यंत आवडीचे असल्याकारणाने नैवेद्यात मोदकांचा समावेश करा. शेवटी, भगवान गणेशाच्या अच्युत मंत्राचा जप करा आणि नंतर आरती करून पूजा संपन्न करा.