कोकणात पाऊस स्थिर, पश्चिम महाराष्ट्रात थांबणारच नाही, काय सांगतंय हवामान खातं?
maharashtra weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) 24 ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज जारी केला आहे.

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान खात्याचा अंदाज

24 ऑगस्ट रोजी विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज
maharashtra weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) 24 ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज जारी केला आहे. तर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जारी केला.
कोकण आणि मध्य महाराष्ट्र मान्सून परिस्थिती :
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई आणि ठाणे परिसरातही मध्यम ते जोरदार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रायगडमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाडा:
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, औरंगाबाद आणि जालना यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र:
नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील. तर सांगली आणि सोलापूरमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूरात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे घाटमाथा, साताऱ्यातील घाटमाथ्यावरील परिसरात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.