“मला कुटुंबापासून दूर जायचंय...” राधिकाची व्हॉट्सअॅप चॅट आली समोर! कोचला नेमकं काय सांगितलं?

मुंबई तक

राधिकाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून हादरवून टाकणारं सत्य समोर आलं आहे. राधिकाने आपल्या टेनिस कोचला भारतात राहण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. राधिका नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या.

ADVERTISEMENT

राधिकाची व्हॉट्सअॅप चॅट आली समोर! कोचला नेमकं काय सांगितलं?
राधिकाची व्हॉट्सअॅप चॅट आली समोर! कोचला नेमकं काय सांगितलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राधिका यादव केसमधील नवा खुलासा

point

राधिकाची व्हॉट्सअॅप चॅट आली समोर

point

आपल्या कोचला राधिकाने नेमकं काय सांगितलं?

Radhika Yadav Case Revealation: गुरुग्राममधील राधिका यादव हत्याकांड संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. इतक्या हुशार आणि धाडसी मुलीला वडिलांनी का मारलं असेल? हाच विचार सर्वांच्या मनात येत आहे. मुलीची हत्या करणारे आरोपी दिपक यादव सध्या पोलीस रिमांडवर आहेत. त्यांची चौकशी केली जात आहे. तिच्या वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला असून आता राधिकाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून हादरवून टाकणारं सत्य समोर आलं आहे. राधिकाने आपल्या टेनिस कोचला भारतात राहण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. राधिका नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या.

व्हॉट्सअॅप चॅटमधून कोचला काय सांगितलं?  

एका चॅनेलला राधिकाची व्हॉट्सअॅप चॅट मिळाली असून त्यामधून बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला आहे. त्यानुसार राधिकाने आपल्या कोचकडे परदेशात जाऊन स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राधिकाने लिहिलं, “इथे खूप बंधनं आहेत, मला माझं जीवन जगायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे. मला ऑस्ट्रेलिया किंवा दुबईला जाऊन स्थायिक होणं आवडेल. चीनला जायला नको कारण तिथे खाण्याचे चांगले पर्याय नाहीत.”

हे ही वाचा: राधिका यादव हत्याप्रकरणातील नवा उलगडा, पोस्ट मॉर्टमचे रिपोर्ट्स अन्... शरीरात ‘इतक्या’ गोळ्या

लोकांच्या टोमण्यांना वैतागला... 

पोलिसांनी आरोपी दिपकची चौकशी केली असता, तो लोकांच्या टोमण्यांना वैतागला असल्याचा खुलासा करण्यात आला. लोक दररोज त्यांना त्रास होणाऱ्या गोष्टी बोलायचे. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, तू मुलीच्या पैशांवर जगत आहेस, असे लोक टोमणे मारायचे. तसेच मुलगी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावते असं देखील लोक तिच्या वडिलांना म्हणायचे. लोकांच्या बोलण्यामुळे त्रस्त होऊन आरोपी दिपक गेल्या तीन दिवसांपासून एकतर स्वत:ला संपवायचं किंवा मुलीला मारून टाकायचं प्लॅनिंग करत होता. गुरुवारी राधिकाच्या वडिलांनी तिला अॅकॅडमीत जाण्यास नकार दिला आणि याच गोष्टीमुळे त्यांच्यात मोठा वाद झाला. या वादामुळे तिच्या वडिलांनी तिचा गोळ्या झाडून खून केला.

हे ही वाचा: मुलीची फी परत मागायला गेला शेतकरी बाप; शाळेच्या संस्थाचालकाने केली मारहाण अन्...

मुलगी चुकीचं करत असल्याचा संशय... 

पोलिसांच्या तपासात आरोपी दिपकची मानसिक अवस्था ठीक नसल्याचं समोर आलं. प्रत्येक गोष्टीत चुकीची बाजू विचारात घेऊन तो नेहमी रागात संशय घ्यायचा. आपली मुलगी नेमकं कोणाशी बोलते आणि का बोलते? याबद्दल सतत आपल्या मुलीला तो प्रश्न विचारत राहायचा. वडिलांच्या संशयामुळे आपण कधीच काही चुकीचं करणार नसल्याचं आश्वासनही राधिकाने दिलं होतं. मात्र, तरीही गुरुवारी पाच गोळ्या झाडून राधिकाची आपल्या वडिलांकडून हत्या करण्यात आली. राधिकाच्या शरीरातून गोळ्या काढण्यात आल्या असून पाचवी गोळी नेमकी कुठे आहे? याचा तपास केला जात आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp