राधिका यादव हत्याप्रकरणातील नवा उलगडा, पोस्ट मॉर्टमचे रिपोर्ट्स अन्... शरीरात ‘इतक्या’ गोळ्या
राधिका यादव हत्याप्रकरणातील नवा खुलासा करण्यात आला आहे. राधिकाचे पोस्ट मॉर्टमचे रिपोर्ट्स समोर आले असून तिच्या शरीरातून एकूण चार गोळ्या काढल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राधिका यादव हत्याप्रकरणातील नवा खुलासा

पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आले समोर

राधिकाच्या शरीरात इतक्या गोळ्या...
Radhika Yadav Murder case: हरियाणातील गुरुग्राममध्ये टेनिस प्लेअर राधिका यादवच्या हत्येमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. राधिकाची हत्या तिच्या वडिलांनीच तिची हत्या केली असून ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याविरोधात आता पुढील कारवाई केली जात आहे. तिच्या वडिलांची चौकशी केली असता ते वारंवार आपल्या जबाब बदलत असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणातील नवा खुलासा करण्यात आला आहे. राधिकाचे पोस्ट मॉर्टमचे रिपोर्ट्स समोर आले असून तिच्या शरीरातून एकूण चार गोळ्या काढल्याची माहिती समोर आली आहे.
पाचवी गोळी नेमकी कुठे आहे?
राधिकाच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी राधिकावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, राधिकाच्या शरीरातून चार गोळ्या काढण्यात आल्या असून पाचवी गोळी नेमकी कुठे आहे? याचा तपास करण्यात येत आहे.
राधिकाची गोळ्या झाडून हत्या
पोस्टमॉर्टम केल्यानंतर राधिकाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे. गुरुवारी दिपक यांनी गुरुग्रामच्या सुशांत लोक परिसरातील आपल्या दोन मजली घरात राधिकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर दिपक यांनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा: मुलीची फी परत मागायला गेला शेतकरी बाप; शाळेच्या संस्थाचालकाने केली मारहाण अन्...
राधिकाच्या आईचा जबाब
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत जबाबामध्ये राधिका चालवत असलेली टेनिस अॅकॅडमी हीच राधिका आणि तिच्या वडिलांमधील वादासाठी कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला आहे. राधिकाचे काका कुलदीप यादव यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या वेळी राधिकाची आई मंजू ही घरातील पहिल्या मजल्यावर होती. राधिकाच्या आईची पोलिसांनी चौकशी केली असता त्यावेळी तिने जबाब देण्यास नकार दिला होता. त्यावेळी आपल्या ताप आला असून खोलीमध्ये आराम करत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. तसेच राधिकाचं चारित्र्य सुद्धा स्वच्छ असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं.
हे ही वाचा: पत्नी OYO हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत गेली, मागून आला पती.. महिलेने 'त्या' अवस्थेतच काढला पळ, Video प्रचंड व्हायरल!
राधिकाची सोशल मीडिया प्रोफाइल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिकाची सोशल मीडिया प्रोफाइल सध्या गायब असून त्याचा तपास केला जाणार आहे. कोर्टाने गुरुग्राम पोलिसांना दिपक यादव यांना 1 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्यात यावा, असा आदेश दिला होता. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कस्टडीची कोर्टाकडे मागणी केली होती. आज पुन्हा दिपक यांना कोर्टात सादर केलं जाणार आहे. पोलिसांच्या मते, आरोपीने ह्त्येच्या दोन तासानंतरच खूनाचं हत्यार लपवलं होतं.