मुलीची फी परत मागायला गेला शेतकरी बाप; शाळेच्या संस्थाचालकाने केली मारहाण अन्...

मुंबई तक

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून मुलीची फी परत करण्यावरून मुलीचे वडील आणि शाळेच्या प्रशासनातील सदस्यांमध्ये मोठा वाद झाला आणि या वादातून मुलीच्या वडिलांची हत्या झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

मुलीची फी परत मागायला गेला शेतकरी बाप; शाळेच्या संस्थाचालकाने केली मारहाण अन्
मुलीची फी परत मागायला गेला शेतकरी बाप; शाळेच्या संस्थाचालकाने केली मारहाण अन्
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शाळेच्या संस्थाचालकांनी केली मुलीच्या वडिलांना मारहाण

point

फी परत मागायला गेले असता वडिलांना जीव जाईपर्यंत मारहाण

point

परभणीच्या शाळेतील धक्कादायक बातमी

Maharashtra News: महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकरी वडिलांना शाळेतून आपल्या मुलीचं ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि फी परत मागायला जाणं महागात पडलं आहे. आपल्या मुलीची फी परत करण्यावरून मुलीचे वडील आणि शाळेच्या प्रशासनातील सदस्यांमध्ये मोठा वाद झाला आणि या वादातून मुलीच्या वडिलांची हत्या झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणा संदर्भात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि फी परत करण्याची मागणी  

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तहसीलच्या झिरो मार्गावर घडली आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तीचं नाव जगन्नाथ हेंगडे असल्याची माहिती समोर आली आहे. हेंगडे यांची मुलगी पल्लवी परभणीतील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिकत होती. या शाळेतील वसतिगृहात ती राहत असून तिला तिथे करमत नसल्याने ती पुन्हा गावी निघून आली. हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये पुढील शिक्षण करण्याची मुलीची इच्छा नसल्यामुळे 42 वर्षीय जगन्नाथ यांनी आपल्या मुलीच्या शाळेत मुलीचं ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि भरलेली फी परत करण्याची मागणी केली.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp