Karjat : 30 फुटावरून कार कोसळली, थेट आदळली मालगाडीवर; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

karjat accident car falls into moving goods train from bridge shocking story
karjat accident car falls into moving goods train from bridge shocking story
social share
google news

Car falls into moving goods train from bridge shocking Accident : मध्य रेल्वेच्या (Central Railway) कर्जत- पनवेल (Karjat- Panvel) स्थानकादरम्यान मंगळवारी मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका कार चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट चारचाकी मालगाडीवर कोसळल्याची घटना घडली होती. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. धर्मानंद गायकवाड (41), चुलत भाऊ मंगेश जाधव (46) आणि नितीन जाधव (48),अशी या मृतांची नावे आहेत. तर दोघांवर रूग्णालयात उपचार सुरु आहे. (karjat accident car falls into moving goods train from bridge shocking story)

मुंबई पनवेल (Panvel) राज्यमार्गावरून अपघातग्रस्त कार नेरळच्या (Neral) दिशेने जात होती. या दरम्यान कार चालक धर्मानंद गायकवाड यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या पुलावरून थेट 30 फूट खाली कोसळली. त्याचवेळी पनवेल येथून कर्जतकडे एक मालवाहू गाडी प्रवास करत होती. त्यामुळे कर्जत कल्याण राज्यमार्गावरून कोसळलेली कार थेट मालगाडीवर जाऊन कोसळली. या अपघातात चालक धर्मानंद गायकवाड (41), चुलत भाऊ मंगेश जाधव (46) आणि नितीन जाधव (48) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी आहेत. त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना मध्यरात्री 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान घडली होती.

हे ही वाचा : Maratha Reservation : “जरांगे ऐकत नाही म्हणल्यावर…”, छगन भुजबळांच्या विधानाने खळबळ

मालगाडी पनवेलहून कर्जतच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. या अपघातामुळे मालगाडीचे काही डब्बे वेगळे झाले होते. तसेच या अपघातामुळे सीआर हायवेचा पनवेल-कर्जत रस्ता पहाटे 3.43 ते सकाळी 7.32 पर्यंत बंद होता. त्याचबरोबर कर्जत-कल्याण मार्गावरून फक्त हुबळी-दादर एक्स्प्रेस (17317) वळवण्यात आली होती, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क संचालक डॉ. शिवराज मानसपूरे यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : ’24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर…’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT