धुळे : प्रचंड दगडफेक, आमदारालाही सोडलं नाही! शिरगावमध्ये हिंसेचा भडका का उडाला?
सांगवी गावात दोन गटात तुफान हाणामारी आणि दगडफेक झाली. पोलिसांनी गावात 144 कलम लागू केलं आहे. याप्रकरणी 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
-विशाल ठाकूर, धुळे
ADVERTISEMENT
Maharashtra Violence Latest news : धुळे जिल्ह्यातील शिरगाव तालुक्यात असलेल्या सांगवी गावात हिंसेचा भडका उडाला. संतप्त जमावाने प्रचंड दगडफेक केली. यात पोलीस प्रशासनासह तहसीलदारांच्या गाडीलाही लक्ष्य करण्यात आलं. या घटनेत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह 15 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 150-200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सांगवीत काय झालं हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
जागतिक आदिवासी दिन साजरा झाला. या निमित्ताने राज्यातही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले. धुळे जिल्ह्यातील शिरगाव तालुक्यात असलेल्या सांगवीमध्येही आदिवासी दिनाचे शुभेच्छा बॅनर्स लावण्यात आले होते. झालं असं की, हे बॅनर्स अज्ञाताने फाडले. त्यावरूनच हिंसेची ठिणगी पडली.
हे वाचलं का?
दोन गटांत हाणामारी, दगडफेक
बॅनर फाडल्याच्या रागातून सांगवीत दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. वाद विकोपाला जाऊन सांगवीमध्ये दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. आदिवासी दिनाचे बॅनर फाडल्यावरून चारणपाड्यामध्येही दोन गट आपापसात भिडले. तुफान दगडफेक करत रास्ता रोको करण्यात आला.
वाचा >> ‘…त्यावेळी गिरीश महाजन हाफ पँटवर फिरायचे’; एकनाथ खडसे का भडकले?
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आमदार काशीराम पावरा यांनी घटनास्थळी पोहोचले. मात्र, यावेळी आधी आपल्याला न भेटता समोरच्या गटाला भेटल्याचा राग अनावर झाल्याने संतप्त जमावाने आमदार काशीराम पावरा यांच्यासह तहसीलदार आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली.
ADVERTISEMENT
पोलीस अधीक्षक म्हणाले…
दरम्यान, याबाबत धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी अधिक माहिती दिली आहे. या वादातून झालेल्या दगडफेकीमध्ये आतापर्यंत तीन पोलीस अधिकारी, 15 कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तब्बल 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी गावामध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याच आवाहन त्यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
वाचा >> “पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असता तर कानशिल लाल केले असते”, आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट
शाळेला सुट्टी
सांगवीमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया जवळील परिसरात ही घटना घडल्याने या ठिकाणी शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. सांगवी गावामध्ये दंगल सदृश्य घडल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. तर या घटनेचा तपास सुरू असून नागरिकांनी शांतता राखण्याच आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT