Maharashtra Rains live Updates : कोकणात मुसळधार पाऊस, उद्या रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट!
Maharashtra Weather forecast : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra weather Forecast Live updates : महाराष्ट्रातील काही भागांत सोमवारी (15 जुलै) पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आज (15 जुलै) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने अनेक एक्स्प्रेस गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
मराठवाड्यातील हिंगोली, परभणीसह विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांतही अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पाऊस कसा असेल, हवामानाचा अंदाज काय, याबद्दल वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...
ADVERTISEMENT
- 02:25 PM • 15 Jul 2024
Raigad Rains live Updates : कोकणात मुसळधार पाऊस, उद्या रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट!
कोकणामध्ये दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आहे. रायगड जिल्ह्यात कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड आणि पोलादपूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. जोरदार पावसामुळं नद्या नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. सावित्री नदी दुथडी भरुन वाहत असून पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहिला तर नदीला पूर येण्याची शक्यता आहे. यामुळे रायगड जिल्ह्याला मंगळवारी (16 जुलै) रेड अलर्ट देण्यात आला आहे.
- 12:13 PM • 15 Jul 2024
Mumbai Rains live Updates : मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात
मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. सोमवारी ११ वाजेपासून पावसाचा जोर वाढला. ताज्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर मार्गासह सर्वच मार्गावरील मुंबई लोकल सेवा सुरळीत सुरू आहे.
- 10:29 AM • 15 Jul 2024
Maharashtra Weather Updates : रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात कसे असेल हवामान, IMD चा नकाशा पहा
- 09:06 AM • 15 Jul 2024
Maharashtra Rains Updates : रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर व माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना १५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
- 08:55 AM • 15 Jul 2024
Konkan railway news update : दरड हटवण्याचे काम सुरू, ताजे अपडेट्स काय?
कोकण रेल्वे 13 तासानंतरही ठप्पच आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सात एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाच गाड्या वेगवेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
दिवाणखावटी-विन्हेरे दरम्यान बोगद्याच्याजवळच दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे रुळ मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. गेल्या काही तासांपासून ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, तुफान पावसामुळे कार्यात अडथळा येत आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे निघालेल्या मात्र खेड, चिपळून आणि रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचबरोबर या प्रवाशांसाठी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT