Manoj Jarange चे शिंदे सरकारला 11 सवाल; म्हणाले, “आम्ही समजू की…”

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil ramps Maharashtra government jarange asked 11 questions to cm shinde
Manoj Jarange Patil ramps Maharashtra government jarange asked 11 questions to cm shinde
social share
google news

Maratha Reservation Manoj Jarange Patil shinde Government : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्ही उपोषण सुरू केलं आहे. गावागावांतून उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत असून, राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यापर्यंत हे जाऊन पोहोचलं आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालेला असताना आता मनोज जरांगे पाटलांनी शिंदे सरकारविरुद्ध दंड थोपटले आहे. जरांगे पाटलांनी शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) शिंदे सरकारला ११ सवाल केले आहेत. याची उत्तरं शनिवारपर्यंत द्यावीत, अन्यथा तुम्ही जे सांगता आहात ते खोटं आहे, असं आम्ही समजू, असं जरांगेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला 11 सवाल

1) कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अधिवेशन घेणार का?

2) सरकार दिल्लीला गेले त्यावेळी पंतप्रधानांना आरक्षणाबद्दल सांगितलं होतं का?

हे वाचलं का?

3) शिंदे समिती गठीत केली तिला 10 हजार पुरावे सापडले. आता समितीचे काम थांबवून मिळालेल्या पुराव्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणार का?

“सर, देवाचा नंबर द्या, माझ्या बाबाला घरी पाठवा”, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीचं CM शिंदेंना ह्रदयद्रावक पत्र

4) ज्या जातींना आरक्षण दिले आहे. 2023 पर्यंत कोण कोणत्या जातींना पुराव्यांच्या आधारावर आरक्षण दिले?

ADVERTISEMENT

5) पुरावे न देता कुठल्या कुठल्या जातींना आरक्षण दिले?

ADVERTISEMENT

6) कोणत्या जातींना व्यवसायावर आधारीत आरक्षण दिले किंवा दुसऱ्या कुठल्या आधारावर आरक्षण दिले?

7) राज्यात ज्या जातींना आरक्षण दिलं, ते नेमके कुठले निकष लावून दिले?

8) ज्या जातींचे 10 वर्षांनी सर्वे करायचे होते, ते सर्वे प्रत्येक 10 वर्षांनी केले का?

9) ज्या जाती प्रगत झाल्या, त्या आरक्षणातून बाहेर काढाव्या असे लिहले आहे का?

10) मंडल कमिशनने 14 टक्के आरक्षण ओबीसींना दिले, कशाचा आधार, कुठला निकष लावून 4 वर्षात आरक्षण कसे दिले याचेही निकष सांगावे.

हे ही वाचा >> Shiv Sena: ‘…असे मराठा मुख्यमंत्री आम्हाला नको’, CM शिंदेंना त्यांच्याच नेत्याने ठणकावलं!

11) ज्या जाती आरक्षणात घातल्या त्यांचा उपजाती/पोटजाती म्हणून किती अंतर्भाव केला काय पुरावे, निकष दिले हे ही सरकारने सांगावे.

मनोज जरांगे पाटलांनी वरील प्रश्न सरकारला विचारले आहेत. त्याचबरोबर “या प्रश्नांची उत्तरं उद्या पर्यंत सरकारने द्यावीत, असे जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. उत्तरं नाही दिली, तर आम्हाला तुम्ही आतापर्यंत सांगितलेलं सगळं खोटं समजू”, असंही म्हटलं आहे. त्यामुळे सरकार नेमकी काय भूमिका मांडणार आणि मनोज जरांगे पाटलांचं समाधान करू शकणार का? या प्रश्नांभोवती चर्चा सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT