Monsoon Update : मान्सून महाराष्ट्रात! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत बरसणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Monsoon enters In Maharashtra, India Meteorological Department (IMD) says progress satisfactory
Monsoon enters In Maharashtra, India Meteorological Department (IMD) says progress satisfactory
social share
google news

Monsoon in Maharashtra in Marathi : शेतीची मशागत करून पेरणीसाठी चातकाप्रमाणे वाट बघणाऱ्या बळीराजाप्रमाणे मे महिन्यातील झळांनी होरपळून निघालेल्या आबालवृद्धाची प्रतिक्षा अखेर संपली. बिपरजॉय चक्रीवादळामुळे वाटेतच मुक्काम ठोकणार नाही ना? या धास्तीने हैराण असलेल्या सगळ्यांना वरुणराजाने रविवारी आल्हाददायक अनुभव दिला. नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी कोकणच्या किनाऱ्यावर वर्दी देताच हवामान विभागाने आनंदाने घोषणा केली… ‘मान्सून आला रे’! (Monsoon Entered in Maharashtra)

ADVERTISEMENT

केरळमध्ये मान्सून (Monsoon) दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात आगमन कधी होणार, यामुळे सगळ्यांच्याच नजरा मान्सूनच्या वाटेकडे लागलेल्या होत्या. अंदाज हवामान विभागाच्या अंदाजाकडे कान लावून बसलेल्यांना रविवारी सुखद वार्ता मिळाली. मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यातील काही भागात पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली होती.

बिपरजॉयने मार्ग बदलला आणि मान्सूनने वेग घेतला

बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालं. त्यानंतर मान्सूनचा वेगही वाढला. 11 जून रोजी कोकण किनारपट्टी पाऊल ठेवत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Mira Road Murder : सरस्वतीच्या हत्येनंतर मनोज साने गुगलवर काय सर्च करत होता?

मच्छिमारांना इशारा

मच्छिमारांना 15 जूनपर्यंत अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. भारताच्या किनारपट्टीवर बिपरजॉय धडकणार नसलं तरी, याचा परिणाम देशात जाणवणार आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक राज्यांत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. गुजरातला सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. या भागात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

या जिल्ह्यांत बरसणार

– हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 12 जून रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भर दुपारी 15 गोळ्या झाडल्या अन् 3 किलो सोनं पळवलं, दरोड्याने कोल्हापूर हादरलं

13 जूनला विदर्भात पावसाची शक्यता

– हवामान विभागाने 13 जून रोजी विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT