अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनाचे तोडले कुलूप! दोन्ही गट भिडले, काय घडलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Ajit pawar vs sharad pawar : clashes in ncp workers in dhule over party office
Ajit pawar vs sharad pawar : clashes in ncp workers in dhule over party office
social share
google news

NCP news sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवारांनी दावा ठोकला आहे. हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचले आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाने राष्ट्रवादीची कार्यालये ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. नाशिकमधील राष्ट्रवादी कार्यालयाच्या वादानंतर आता धुळ्यात दोन्ही गटात राडा झालाय. अजित पवार-शरद पवारांमधील वाद इतका वाढला की, पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. (Supporters of sharad pawar and ajit pawar clashes over party office)

ADVERTISEMENT

2 जुलै रोजी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. फुटलेल्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला आहे. याचे पडसाद स्थानिक राजकारणातही उमटू लागले आहे. पक्षातील फुटीनंतर अजित पवार गटाकडून स्थानिक पक्ष कार्यालये ताब्यात घेण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे.

वाचा >> “मराठीचा अपमान….”, CM शिंदेंच्या आमदाराने भाजप आमदाराला सुनावलं

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता धुळ्यात अजित पवार समर्थक आणि शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धुळ्यात काय झालं?

मंगळवारी (8 ऑगस्ट) दुपारी अचानक अजित पवार गटाचे सारांश भावसार पदाधिकाऱ्यांना घेऊन राष्ट्रवादी भवनात बैठक घेण्यासाठी आले होते. मात्र त्यांना चावी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी कार्यालयाचे त्यांनी कुलूप तोडले.

शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी भवनात दाखल झाले. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ADVERTISEMENT

वाचा >> Ncp ECI : राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह काढून घेतलं जाऊ शकत, पण…; शरद पवारांनी काय सांगितलं?

त्यानंतर दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवनाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप लावून वाद झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी दोन्ही गटांना कुलूप लावण्यास परवानगी दिली आणि राष्ट्रवादी भवन बंद केले. वरिष्ठांचा आदेश येईपर्यंत राष्ट्रवादी भवन बंद असणार आहे.

ADVERTISEMENT

अनिल गोटे शरद पवारांची साथ सोडणार?

दरम्यान, सकाळच्या सुमारास अचानकपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उप प्रदेशाध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी भवनातील सामान वाहून नेल्याने वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. त्यानंतर अचानकपणे घडलेली ही घटना चर्चेचा विषय झाली ठरली. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी भवनाचा ताबा नेमका कुठला गटाला मिळतो? हे पाहावे लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT