Govt Job: इंडियन आर्मीमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती... कधीपर्यंत कराल अर्ज?

मुंबई तक

इंडियन आर्मीने एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या 66 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) टेक पुरुष/महिला कोर्ससाठी अर्जाची सुरुवात केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 16 जुलैपासून सुरू झाली करण्यात आली असून उमेदवार 14 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करु शकतात.

ADVERTISEMENT

इंडियन आर्मीमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती...
इंडियन आर्मीमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंडियन आर्मीकडून नव्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर

point

इंडियन आर्मीमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती

Govt Job: भारतीय सैन्यात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीअंतर्गत उमेदवार कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय पदांवर थेट भरती होऊ शकतात. इंडियन आर्मीने एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या 66 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) टेक पुरुष/महिला कोर्ससाठी अर्जाची सुरुवात केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 16 जुलैपासून सुरू झाली करण्यात आली असून उमेदवार 14 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. या भरतीअंतर्गत एकूण 379 रिक्त जागा भरण्यात येतील. 

रिक्त जागा

पुरुषांसाठी - 350 जागा
महिलांसाठी - 29 जागा 

शैक्षणिक पात्रता 

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून  बी.ई (B.E)/बीटेक (B.Tech) ची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, केवळ अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करु शकतात. शेवटच्या वर्षात शिकत असलेले उमेदवार सुद्धा या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. पण, अशा उमेदवारांना 1 एप्रिल 2026 पर्यंत उत्तीर्ण असल्याचा पुरावा सादर करावा लागेल. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, वयोमर्यादा देखील भरती नियमांनुसार निश्चित करण्यात आली आहे.

हे ही वाचा: पुण्यात खळबळ! पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!

वयोमर्यादा: या भरतीसाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 27 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 

वेतन: यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 

निवड प्रक्रिया: या भरतीमध्ये नियुक्तीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. शॉर्टलिस्टिंग, एसएसबी मुलाखत, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल टेस्ट या माध्यमातून उमेदवारांची निवड थेट ऑफिसर पदांवर केली जाईल. 

हे ही वाचा: महिलांच्या 'त्या' अ‍ॅपमध्ये पुरुषांबद्दल सीक्रेट चॅट्स; पण हॅक झालं अन् 72,000 हजार फोटो...

कसा कराल अर्ज? 

सर्वप्रथम www.joinindianarmy.nic.in या इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटवर जा. 
त्यानंतर होमपेजवरील ऑफिसर एंट्री/अप्लाई लॉगिन सेक्शनमध्ये जा. 
आधी रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा. 
नंतर सर्व माहिती भरल्यानंतर नोंदणी करा आणि पुन्हा लॉगिन करा.
त्यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरा आणि योग्य साइजमध्ये डॉक्यूमेंट्स अपलोड करा. 
शेवटी फॉर्म सबमिट करुन प्रिंटआउट काढा आणि भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा. 

इंडियन आर्मीच्या या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp