Viral Story : एका वर्षाच्या मुलाने सापाचाच घेतला चावा, सापाचा गेला जीव, डॉक्टर काय म्हणाले?
Viral Story एक वर्षाच्या बाळाने एका विषारी सापालाच चावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं स्थानिक आणि डॉक्टरांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बाळाने एका विषारी सापालाच चावलं

डॉक्टरांनाही मोठा आश्चर्याचा धक्का
Viral Story : राज्यातील पालघरमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली होती. लहान 4 वर्षांची मुलगी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून जमिनीवर कोसळली. त्यात त्या लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेकडे अनेकजण आईच्या निष्काळजीपणाला दोष देत आहेत. या घटनेनं राज्य हादरून गेलं होतं. त्यानंतर आता बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक वर्षाच्या बाळाने एका विषारी सापाचाच चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं स्थानिक आणि डॉक्टरांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, एक वर्षाचा मुलगा गोविंद कुमार हा त्यांच्या घरात खेळत बसला होता. त्याच ठिकाणी एक साप आला असता, ते लहान बाळ त्या सापाकडे गेलं आणि त्या बाळानं त्या सापाला पकडलं. हे ऐकून तुम्हाला थोडा आश्चर्याचा धक्काच बसला असेल. त्यानंतर ते बाळ साप चावू लागला होता. तेव्हाच त्या बाळाच्या आजीने हे चित्र पाहिल्यास तिला मोठा धक्का बसला आहे. आजी त्या बाळाला वाचवण्यासाठी धावली असता, साप मेलेला होता. पण अचानकपणे बाळ बेशुद्ध झाला.
या एकूण प्रकरणादरम्यान, कुटुंबीयांनी बाळाला एका जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणी प्राथमिक उपचारादरम्यान, गोविंदला बेतियाच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालायात पाठवले गेले. दरम्यान, या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होत आहे. एका वर्षाच्या बाळानं केलेल्या या कामाचे लोकच आता कौतुक करत आहेत. तर काही लोक पालकांचा निष्काळजीपणा असल्याचं म्हणत आहेत.
दरम्यान, लहान बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. बाळाची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान बाळ बरे व्हावे यासाठी ग्रामस्थ देवाकडे प्रार्थना करत आहेत.